पशुधन वाढीसाठी कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST2021-09-06T04:35:24+5:302021-09-06T04:35:24+5:30
एकीकडे शासनाकडून कृत्रिम रेतनासारखा उपक्रम राबवण्यात येत असताना जिल्ह्यातील पशुधन मात्र गेल्या १० वर्षात कमी झाल्याचे २० व्या पशुगणनेवरुन ...

पशुधन वाढीसाठी कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा आधार
एकीकडे शासनाकडून कृत्रिम रेतनासारखा उपक्रम राबवण्यात येत असताना जिल्ह्यातील पशुधन मात्र गेल्या १० वर्षात कमी झाल्याचे २० व्या पशुगणनेवरुन दिसून आले आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात तीन लाख २ हजार ६८ गायवर्गीय प्राणी आहेत. ७२ हजार ९२९ म्हैसवर्गीय, तीन लाख ११ हजार ८० शेळ्या, ३५ हजार ४५१ मेंढ्या आहेत. कधीकाळी दुपटीने असलेले हे धन कमी झाल्याने पशुपालक त्यांच्या संगोपनासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी डाॅ. यु.डी.पाटील यांना संपर्क केला असता, राज्य शासनाचा कृत्रिम रेतन कार्यक्रम हा सर्वार्थाने पशुंची संख्या वाढवण्यास सहाय्यकारी ठरणार आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबवण्यासाठी ग्रामसभा घेत माहिती दिली आहे. येत्या काळात कृत्रिम रेतनातून जन्मा येणाऱ्या कालवडींची संख्या वाढती राहून पशुधनातही वाढ होणार आहे.