The basic journey to learn the problem | समस्या जाणून घेण्यासाठी केला पायी प्रवास

समस्या जाणून घेण्यासाठी केला पायी प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव आणि अक्राणी परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी वरिष्ठ अधिका:यांसह 20 किलोमीटर पायी प्रवास केला. दरम्यान, समस्या जाणून घेतल्यानंतर पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिका:यांनी संबंधित अधिका:यांना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, तहसीलदार राजेश थोटे, तालुका कृषी अधिकारी बापू गावीत आदी होते.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गावाकडे जाणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तयार केलेल्या रस्त्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याने जिल्हाधिका:यांनी धडगावपासून अचपार्पयत वाहनाने प्रवास केल्यानंतर पुढील प्रवास पायी करून जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. अचपा ते तिनसमाळ असे 20 किलोमीटरचा त्यांनी अधिका:यांसह पायी प्रवास केला. तिनसमाळ येथे पलासपाणीपाडा, पाटीलपाडा, दुकानपाडा, डुठ्ठलपाडा व गुडानपाडा येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून त्यांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिका:यांना दिल्या. त्यांनी ग्रामस्थांशी व त्यांच्या मुलांशी आस्थेवाईकपणे चर्चा केली. गावाच्या विकासाबाबत चर्चा केल्यानंतर आचपार्पयतचा परतीचा प्रवासदेखील पायीच झाला. स्वत: जिल्हाधिकारी पायी चालत भेट देण्यासाठी आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पाडय़ावरील  नागरिक तानाजी पावरा, वसंत पावरा, रेहंडय़ा पावरा, जितेंद्र पावरा, लालदास पावरा, फाडा पावरा व इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिका:यांना गावातील समस्यांविषयी माहिती दिली.
 

Web Title: The basic journey to learn the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.