शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सातपुडा पायथ्याशी आंब्याच्या बागा बहरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या रांझणी, गोपाळपूर, पाडळपूर, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसनसह परिसरातील आंबा बागांमध्ये यंदा ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या रांझणी, गोपाळपूर, पाडळपूर, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसनसह परिसरातील आंबा बागांमध्ये यंदा चांगलाच बहर आला आहे. या बागांमध्ये सध्या तुडतुडे, फुल किडींचा प्रादुर्भाव झाला असून, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून लागलीच किटक नाशकांची फवारणी करण्यात येत आहे.या परिसरातील आंबा बागा फार प्रसिद्ध असून, यातून आंबा उत्पादक शेतकरींना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असते. परिसरातील आंब्यांना नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पूर्णपणे मोहोर येण्यास सुरूवात झाली होती. परंतु अनियमित हवामानामुये तुडतुडे, फुलकिडीचा प्रादुर्भाव झाला तर काही आंब्यांवर अल्प प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरींकडून फवारणी करण्यात येत आहे.दरम्यान तुडतुडे हे करड्या रंगाचे पाचराच्या आकाराचे किटक पालवी, मोहोर यांचा रस शोषण करीत आहेत. तसेच आपल्या अंगातून बाहेर पडणारा चिकट द्रव सोडत असल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत आहे. फुलकीडी ही कोवळी पाने, मोहोरवरील फुले आणि दांडे कुरतडत असल्याने मोहोर तांबुस होऊन गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तत्काळ फवारणी करण्यात येत आहे.सातपुडा पायथ्यालगतच्या या परिसरात आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणावर असून, शेती या मुख्य व्यवसायाबरोबरच आंबा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्यात येत असते. या परिसरातील आंबा मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी जात असतो. त्यामुळे आंबा पिकावर झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकºयांकडून चिंता व्यक्त केली जात असून, तत्काळ फवारणी करण्यात येत आहे.आंबा पिकावर झालेल्या तुडतुडे, फुलकिड तसेच बुरशीच्या प्रादुर्भावाची तालुका कृषी विभागाने पाहणी करून शेतकºयांना कीटक नाशकांच्या फवारणीबाबत योग्य सल्ला देण्यात येत आहे. तसेच आंबा पिकाची निगा राखण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहे.