सारंगखेडा ते कहाटूळ रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST2021-06-03T04:22:07+5:302021-06-03T04:22:07+5:30
सारंगखेडा-कळंबू-पुसनद या गावांच्या शेतकऱ्यांची मोठी ये-जा असते. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, बैलगाडी यांना या काटेरी झुडपामुळे रस्त्यावर चालताना मोठी तारेवरची कसरत ...

सारंगखेडा ते कहाटूळ रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांचा वेढा
सारंगखेडा-कळंबू-पुसनद या गावांच्या शेतकऱ्यांची मोठी ये-जा असते. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, बैलगाडी यांना या काटेरी झुडपामुळे रस्त्यावर चालताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. पाच ठेकेदारांनी मिळून या रस्त्याचे टप्प्याटप्प्याने काम केले आहे. काही ठेकेदारांनी आपल्या हद्दीतील काटेरी झुडूपे तोडली आहेत, तर काहींनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याची तक्रार शेतकरी, ग्रामस्थ व वाहनधारक करीत आहेत. ही काटेरी झुडपे त्वरित तोडावीत अशी मागणी सारंगखेडा, पुसनद, कहाटूळ परिसरातील नागरिक करीत आहेत . रस्ता दुरुस्ती व देखभालीसाठी पाच वर्ष ठेकेदारांनी याची देखभाल व दुरुस्ती करायची असल्यावर देखील याकडे ठेकेदार साफ दुर्लक्ष करीत आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची ही समस्या सोडवावी अशी अपेक्षा आहे. रस्त्यावरील हद्दीच्या खुणा त्याचबरोबर वळण रस्ता तसेच अपघाती क्षेत्र किलोमीटर दर्शविणारे फलक देखील रस्त्यावर लावण्यात आलेले नाहीत.