चार वाजता बार बंद, रस्त्यावरच ‘दे दारू’ सुरू, खेडदीगर, सुलतानपूर फाटा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:26+5:302021-07-21T04:21:26+5:30
शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या रायखेड दूरक्षेत्रातील महाराष्ट्र व मध्य प्रदेशचा सीमावर्ती भाग असलेल्या खेडदीगर, सुलतानपूर फाटा ...

चार वाजता बार बंद, रस्त्यावरच ‘दे दारू’ सुरू, खेडदीगर, सुलतानपूर फाटा परिसर
शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या रायखेड दूरक्षेत्रातील महाराष्ट्र व मध्य प्रदेशचा सीमावर्ती भाग असलेल्या खेडदीगर, सुलतानपूर फाटा येथील दुपारी चार वाजेनंतर बार बंद असून, मात्र बारचे मागून दरवाजे उघडे असल्याचे आढळून आले. तसेच याठिकाणी आतून अवैध दारू विक्री होत असून रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू असतो. त्यामुळे या भागातील नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहेत.
रस्त्यावरच भरते मधुशाळा
खेडदीगर नाका परिसर -खेडदीगर येथील नाका परिसरातील बारच्या शेजारी मद्यपींची मधुशाळा भरते. जवळच असलेल्या बीअरबारमधून दारू विकत घेतात आणि पलीकडे असलेल्या रुममध्ये जाऊन बसत असल्याचे चित्र पाहणीत दिसून आले.
खेडदीगरहून खेतिया मार्गावरच एक बार आहे. आधी मद्यपींचा वावर समोरून होता. मात्र, कोरोनामुळे समोरचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून बाजूने मागे जायला रस्ता असून मद्यपी बारमध्येच बसून मद्यपान करताना दिसून आले.
सुलतानपूर फाटा - शहादा-खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाटा (दरगाह फाट्यावर) एका हॉटेलमध्ये दारू विक्री होत असल्याचे आढळून आले असून अतिआवश्यक पार्सल सेवेच्या नावाखाली खुलेआम दारू विक्री सुरू आहे. येथून जवळच रायखेड दूरक्षेत्र असून कारवाई करण्याची तसदी पोलीस घेत नाही.
दुपारी चार वाजेनंतर सुरू असलेल्या संबंधित बार (दारू विक्री केंद्रावर)वर आमचे कर्मचारी पाठवून कारवाईच्या सूचना देतो. तसेच संबंधित ग्रामसेवकांनाही सूचना करतो.
-निवृत्ती पवार, पोलीस निरीक्षक, म्हसावद पोलीस ठाणे
आम्ही कॉलनीतील नागरिक या बारमुळे त्रस्त आहोत. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी दारू विक्री होत असल्याने येथे मद्यपींचा वावर असतो. येथेच पार्सल विकत घेऊन दारू पिली जाते.
-नागरिक, खेडदीगर, ता.शहादा
घरांना लागूनच बार असून नेहमीचा त्रास आहे. संबंधित पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
-नागरिक खेडदीगर, ता.शहादा