तळोद्यात बँक कर्मचारी व सुरक्षा रक्षकास मारहाण; एकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:23 IST2020-05-14T10:23:37+5:302020-05-14T10:23:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रांग तोडणाऱ्या ग्राहकास रांगेत उभे राहण्याचे सांगितल्याचा राग येऊन ग्राहकाने बँकेच्या शिपाई व सुरक्षा ...

Bank employees and security guards beaten at the bottom; Action on one | तळोद्यात बँक कर्मचारी व सुरक्षा रक्षकास मारहाण; एकावर कारवाई

तळोद्यात बँक कर्मचारी व सुरक्षा रक्षकास मारहाण; एकावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : रांग तोडणाऱ्या ग्राहकास रांगेत उभे राहण्याचे सांगितल्याचा राग येऊन ग्राहकाने बँकेच्या शिपाई व सुरक्षा रक्षकाला उलट मारहाण केली. या कर्मचाऱ्यांनी त्याला ही चोपले. हा प्रकार पोलिसांना कळविल्यानंतर त्यास ताब्यात घेत समज देवून सोडून देण्यात आले.
याबाबत असे की, सोमवारी एक ग्राहक आपली केवायसी बँक खात्याला जोडण्यासाठी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बँकेत गेला होता. त्यावेळी बँकेसमोर ग्राहकांची रांग लागली होती. या व्यक्तीस तेथे ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने रांगेत उभे राहण्याचे सांगितले होते. हा व्यक्ती लाईन तोडून उभा होता. पुन्हा त्याला त्या कर्मचाºयांनी रांग तोडण्याबाबाबत जाब विचारला त्याचे वाईट वाटून या ग्राहकाने कर्मचाºयांवर हात उचलला. त्यांनतर कर्मचाºयांनी ही त्याला चांगलेंच चोपले. हा प्रकार पाहून ग्राहकही भयभीत झाले. शेवटी बँकेतील वरीष्ठ अधिकाºयांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस बँकेत दाखल झाले. ग्राहकाला पोलीस ठाण्यात नेऊन कडक समज देऊन सोडून देण्यात आले.
याबाबत पोलीस ठाण्यात विचारले असता याप्रकरणी नोंद घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. तथापि या घटनेमुळे बँक कर्मचाºयांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, अश्या माथेफिरूचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोरोणा विषाणुच्या पार्श्वभूमीवर बँक कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत असतांना त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेत रोज ग्राहकांची गर्दी दिसून येत असून, सोशल डिस्टन्सिंग राखणे जिकरीचे होत असल्याचे चित्र आहे. अश्यातच बँक कर्मचारी उपलब्ध तेवढे प्रतिबंधात्मक साहित्य वापरून ते सेवा पुरवित असतांना त्यांना ग्राहकांचा रोष देखील पत्करावा लागत आहे. त्यातच काहींची मारहाणीपर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे बँक कर्मचाºयांना आता कोरोना सोबत अश्या माथेफिरूनादेखील सामोरे जावे लागत आहेत.

Web Title: Bank employees and security guards beaten at the bottom; Action on one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.