अक्कलकुव्यात कर्मचारी क्वारंटाईन झाल्याने बँक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:49 IST2020-07-28T12:49:24+5:302020-07-28T12:49:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेत कार्यरत असणाऱ्या अधिकाºयाला कोरोनाची बाधा झाल्याचे ...

Bank closed due to staff quarantine in Akkalkuwa | अक्कलकुव्यात कर्मचारी क्वारंटाईन झाल्याने बँक बंद

अक्कलकुव्यात कर्मचारी क्वारंटाईन झाल्याने बँक बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अक्कलकुवा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेत कार्यरत असणाऱ्या अधिकाºयाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या संपर्कातील सहा कर्मचाºयांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यामुळे पुढील आदेशापर्यंत बँक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान तालुक्यातील रामपूर व मिºयाबारी येथे पाहुणचार घेतलेल्या गुजरात राज्यातील एकाचा अहवाल गुजरात राज्यात पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे रामपूर आणि मिºयाबारी येथील संपर्कातील व्यक्तिंना खापर येथे संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचा स्वाब घेण्यात आला आहे.
तालुक्यात कोरोनाचे १२ रुग्ण आढळले होते. तब्बल तीन आठवड्यानंतर पुन्हा अक्कलकुवा शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अक्कलकुवा शहरातील स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेत कार्यरत असणारे एक अधिकारी हे नागपूर येथील आहेत. अधिकारी हे नियमित पणे आपल्या शाखेत कार्य करीत होते. काही दिवसांपासून या अधिकाºयाची तब्बेत बिघडत असल्याने अधिकारी हे रजा घेऊन खाजगी वाहनाने नागपूर येथे गेले तेथे त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतल्याने त्यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. नागपूर प्रशासनाने तसे कळविले असून, या अधिकाºयांच्या संपर्कातील सहा लोकांना खापर येथे संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात येऊन त्यांचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. सहा लोकांमध्ये पाच कर्मचारी हे बँकेचे आहेत तर एक महिला बाधिताच्या घरात घरकाम काम करणारी आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेतील पाच कर्मचाºयांना एकाच वेळी क्वॉरंटाईन करण्यात आल्यामुळे बँकेचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत. बाधित अधिकाºयावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.
तर दुसरीकडे तालुक्यातील रामपूर व मिºयाबारी येथे गुजरात राज्यातील उमराण येथील एका कोरोना बाधिताने बहिणीच्या घरी येऊन पाहुणचार घेतला त्यामुळे रामपूर व मिºयाबारी येथील बाधिताच्या संपर्कातील नऊ लोकांना खापर येथे क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. गुजरात राज्यातील उमरान येथील एका तरुणाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने तेथील नागरिकांनी या तरूणाला सागबारा येथे शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे त्या तरुणाने सागबारा येथे जाऊन स्वॅब दिला होता. पण लक्षणे दिसून न आल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्या तरूणाला घरी पाठविले. यानंतर मात्र या तरुणाने तालुक्यातील मिºयाबारी येथे पाहुणचार घेतला. सागबारा येथील तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी या तरूणाला कोरोनाची बाधा झाल्याचे दूरध्वनीद्वारे सांगितले व बाधीत तरुणाला सागबारा येथे बोलवून घेऊन उपचारार्थ राजपिपला येथे पाठविले आहे. मिºयाबारी येथे आलेल्या तरूणाचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याची माहिती सागबारा प्रशासनाने अक्कलकुवा प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार बाधित तरूणाने भेट दिलेल्या रामपूर व मिºयाबारी या गावात निर्जंतुकीरणाची फवारणी करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत खापर येथे २१ जणांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील मालखेडे यांनी दिली.

Web Title: Bank closed due to staff quarantine in Akkalkuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.