बँक ऑफ बडोदाच्या खांडबारा शाखेत अधिकाऱ्याअभावी कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:53+5:302021-08-28T04:33:53+5:30
खांडबारा येथे बँक ऑफ बडोदाची शाखा असून शाखाधिकारी, दोन अधिकारी, दोन कॅशिअर, एक कारकून, एक शिपाई अशी पदे मंजूर ...

बँक ऑफ बडोदाच्या खांडबारा शाखेत अधिकाऱ्याअभावी कामे ठप्प
खांडबारा येथे बँक ऑफ बडोदाची शाखा असून शाखाधिकारी, दोन अधिकारी, दोन कॅशिअर, एक कारकून, एक शिपाई अशी पदे मंजूर आहेत. पैकी अधिकारी भोसले यांची मुंबई, रामकुमार झा यांची पटणा (बिहार), सूरज गवळी यांची शिरपूर येथे बदली झाल्याने आता शाखेत केवळ शाखाधिकारी, कॅशिअर व शिपाई एवढीच पदे कार्यरत आहेत. खांडबारा शाखेला ४० ते ४५ गावे जोडलेली असून, शेतकऱ्यांची पीक कर्ज प्रकरणे, माध्यमिक शाळांचे वेतन, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांची खाती या शाखेत असल्याने रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. नव्याने अधिकारी व कर्मचारी न दिल्याने कामे धिम्या गतीने होतात. यामुळे अधिकारी व ग्राहक यांच्यात वादविवादही होतात. त्यातून विनाकारण शाखाधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन शाखेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करून शाखेतील तक्रारी कमी कराव्यात, अशी मागणी बँक ग्राहकांनी केली आहे.