वेगवान वाऱ्यांमुळे कुढावद येथे केळी जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 11:58 IST2019-05-07T11:57:41+5:302019-05-07T11:58:09+5:30

शेतकऱ्यांचे नुकसान : त्वरीत पंचनामा करण्याची मागणी, टरबूजाचेही झाले नुकसान

Banana banana in Kuhavad due to the fierce winds | वेगवान वाऱ्यांमुळे कुढावद येथे केळी जमिनदोस्त

वेगवान वाऱ्यांमुळे कुढावद येथे केळी जमिनदोस्त

नंदुरबार : शहादा तालुक्यातील कुढावद शिवारात असलेल्या केळीच्या बागाचे उष्ण व वेगवान वाºयांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ परंतु अद्यापही तालुका प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला नसल्याने नुकसानग्रस्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़
कुढावद ता़ शहादा येथे मोठ्या संख्येने शेतकºयांकडून केळीचे पिक घेण्यात येत असते़ मागील चार ते पाच दिवसांपासून परिसरात वेगवान वारे वाहत आहेत़ त्यामुळे परिसरातील संपूर्ण केळी बागा झोपल्या असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे़ रेखाबाई गुलाबराव पाटील व राजाराम चिंता पाटील यांचे कुढावद शिवारात १२ एकरावर केळीचे पिक घेण्यात आले होते़ परंतु उष्ण व वेगवान वाºयांमुळे त्यांचे संपूर्ण पिक जमिनदोस्त होऊन यात त्यांचे १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे़
परिसरातील अन्य क्षेत्रांवरीलही टरबूज, पपई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़ दरम्यान परिसरात वेगवान वाºयांमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत़ परिसरातील शेतकºयांकडून तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदींकडे पंचनामे करण्यासाठी पाठपुरावा केला आहे़ परंतु अद्याप पंचनाम्यासाठी शासकीय यंत्रणेकडून कार्यवाही होत नसल्याने संबंधित शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे़
सध्या परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात वेगवान वारे वाहत आहेत़ त्यामुळे साहजिकच शेतकºयांकडून धाकधूक व्यक्त केली जात आहे़ आधीच कमी पाण्यात कसेबसे पिक जगविण्यात आलेले होते़ त्यातच नैसर्गिक आपदेमुळे अशा प्रकारे जवळ आलेला घास दुरावत असल्याचे सांगण्यात येत आहे़

Web Title: Banana banana in Kuhavad due to the fierce winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.