नवापुरात चिकन व अंडी विक्रीवर घातली बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 11:54 IST2021-02-06T11:54:32+5:302021-02-06T11:54:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरांमधील पोल्ट्रीमधील कुकुट पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय योजना सुरू केल्या ...

नवापुरात चिकन व अंडी विक्रीवर घातली बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरांमधील पोल्ट्रीमधील कुकुट पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय योजना सुरू केल्या आहे. शहरातील सर्व चिकन अंडी विक्रीवर बंद करण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार शनिवारपासून सर्व चिकन व अंडी विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.
नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू संकट गडद झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन भोपाल येथुन रिपोर्ट आल्यानंतरच बर्ड फ्ल्यू आहे की नाही हे स्पष्ट करणार आहे. शहरात चिकन व अंडी विक्रीवर बंदी केल्याने व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली रिपोर्ट आला नाही तर बंदी कशी असा सवाल उपस्थित केला.
नवापूर शहरातील २६ पोल्ट्रीमध्ये दररोज कोंबड्याच्या मरण्याचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. त्या अनुषंगाने आज नवापूर शहरातील डायमंड, परवेज पठाण, व्होरा पोल्ट्री फॉर्म मध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांत अधिकारी वसुमना पंत, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यादरम्यान व्यवसायिकांना काही उपाय योजना संदर्भात सूचना केल्या आहेत. शहरातील सर्व पोल्ट्री फार्म सील करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने महसूल, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. यादरम्यान जिल्हाधिकार्यांनी व्होरा पोल्ट्री फार्म येथे सर्व कागदपत्रांची पाहणी केली व पोल्ट्री व्यवसायिकांना काही उपयोजनात्मक सूचना केल्या आहेत. नवापुर तालुक्यातील ११ पक्ष्यांचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. त्यानंतर तेथून भोपाल येथे अहवाल पाठवण्यात येईल. बर्ड फ्लू आहे की नाही हे भोपालचा अहवाल आल्यानंतरच जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत शहरातील पोल्ट्री फार्म, पोल्ट्री व्यावसायिक, स्थानिक अधिकारी, पशुसंवर्धन, महसूल, पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात येईल यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली.
नाशिक विभागातील पशुसंवर्धन विभागाचे पथक नवापूर शहरात दाखल झाले आहे. त्यांची निवासाची व्यवस्था नवापूर सीमा तपासणी नाक्यावर करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात प्रशासनाची हालचल सुरू झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दिवसभरात साडेतीन हजार कोंबड्यांचा मृत्यू
नवापूर तालुक्यातील एकूण २८ पोल्ट्री फार्म असून २६ पोल्ट्री मध्ये एकूण ९ लाख ४ हजार ४९८ कुकुट पक्षी आहेत. आज दिवसभरात ३६६४ पक्षी मेली आहे.
आतापर्यंत एकुण २२ पोल्ट्री सील करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रशासन संपुर्ण अलर्ट झाले आहे.
पक्षी मेलेला आढळला तर संपर्क करा
नवापुर तालुक्यातील कोंबड्यांचं अचानक मेलेल्या अवस्थेत आढळले किंवा पक्षी आढळून आले तर त्या पक्षांना हात न लावता तात्काळ पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क करावा. संपर्कासाठी डॅा. अशोक वळवी पशुधन विकास अधिकारी ८२०८२८२९८८, डॉ. योगेश गावित- ९०११३६११६५, डॉ. अमित पाटील-८९९९३४०४०८ यांच्याशी संपर्क करावा.