बामखेडा महाविद्यालयाला नॅकची ‘बी प्लस प्लस’ श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:31+5:302021-09-03T04:31:31+5:30
बामखेडा येथील कला महाविद्यालयाचे मूल्यांकन राष्ट्रीय पातळीवरील समितीने केले. या समितीत आचार्य ए.डी.एन. बाजपयी (कुलगुरू, अटलबिहारी वाजपेयी युनिव्हर्सिटी, बिलासपूर, ...

बामखेडा महाविद्यालयाला नॅकची ‘बी प्लस प्लस’ श्रेणी
बामखेडा येथील कला महाविद्यालयाचे मूल्यांकन राष्ट्रीय पातळीवरील समितीने केले. या समितीत आचार्य ए.डी.एन. बाजपयी (कुलगुरू, अटलबिहारी वाजपेयी युनिव्हर्सिटी, बिलासपूर, मध्य प्रदेश), प्रा. अमरेश दुबे (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली), मिरट इन्स्टिट्यूट उत्तर प्रदेश येथील डॉ. एन. पी. सिंग यांचा समावेश होता. या समितीने महाविद्यालयाचे मूल्यमापन केले. यात महाविद्यालयात चाललेले अध्ययन-अध्यापनाचे कार्य, वापरले जाणारे आयसीटी टूल्स, उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी योजना व उपक्रम, संशोधन कार्य आदींसंदर्भात निरीक्षण केले. समितीने प्रवेशित विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्याशीही संवाद साधला. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे, शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा पुरविणारे महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाचे कौतुक केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जी. आय. पटेल, उपाध्यक्ष पी. बी. पटेल व सचिव बी. व्ही. चौधरी व व्यवस्थापन मंडळाने कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, समन्वयक डॉ. वाय. आर. पाटील, सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी समितीच्या मूल्यांकन कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.