शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

गढवली व निगदी येथे ३८ एकरवर बांबू लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : : तालुक्यातील गढवली व धडगाव तालुक्यातील निगदी येथे सामुदायिक वनअधिकार प्राप्त जंगल जमिनीवर संबंधित ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : : तालुक्यातील गढवली व धडगाव तालुक्यातील निगदी येथे सामुदायिक वनअधिकार प्राप्त जंगल जमिनीवर संबंधित गावातील वनअधिकार व्यवस्थापन व नियोजन समितीच्या पुढाकाराने ३८ एकर क्षेत्रावर बांबू लागवड सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी लावण्यात आलेली २५ एकरातील ८५ टक्के वृक्षे जगली आहेत. साहजिकच यामुळे या दोन्ही गावांमधील वनसंपदेत भर पडली आहे.गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे. त्यातच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. साहजिकच गावस्तरावरील वनव्यवस्थापन समित्यांनी वृक्ष लागवडीची मोहीमदेखील दोन-तीन दिवसापासून हाती घेतली आहे.तळोदा तालुक्यातील गढवली व धडगाव तालुक्यातील निगदी या दोन गावांमधील वनअधिकार व्यवस्थापन व नियोजन समितीच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या सामुदायिक वनअधिकार प्राप्त जंगल जमिनीवर ३८ एकर क्षेत्रावर बांबू लागवडीचे काम शुक्रवारपासून हाती घेतले आहे. यात गढवली येथे २५ एकर तर निगदी येथे १२.५० एकर असे लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत विशेषत: गावातील तरूणांचा अधिक समावेश आहे.गेल्या वर्षीदेखील गढवली गावात २५ एकर क्षेत्रावर गावकऱ्यांनी आंबा, बांबू, सीताफळ अशा विविध रोपांची लागवड केली होती. त्यातील ८५ टक्के रोपे आजही जीवंत असून, यामुळे गावाच्या वनसंपदेत एक प्रकारे भरच पडली आहे.शिवाय गावातील अधिका-अधिक वनसंपदा वाढविण्याचा संकल्प या दोन्ही गावांमधील ग्रामसभांनी केला आहे. त्यांच्या या वृक्ष लागवड मोहिमेला लोक समन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन, प्रतिभा शिंदे, गणेश पराडके, मुकेश वळवी, नारायण पावरा, देविसिंग वसावे, निशांत मगरे यांच्या बरोबरच वनविभागाच्या अधिकाºयांचे सहकार्य मिळत असल्याचे गावकरी सांगतात.गेल्या वर्षी वृक्ष लागवड मोहिमेला १ जुलैपासून तळोदा वनविभागाने सुरूवात केली होती. तथापि यंदा वनविभागाने आपल्या कार्यक्षेत्रात ९ जुलैपासून वृक्ष लागवड मोहिम सुरू केली आहे. दमदार पावसाअभावी मोहिम सुरु करण्यास विलंब झाल्याचे वनविभागाचे म्हणणे होते. यंदा तळोदा मेवासी वनविभागाकडून तळोदा, अक्कलकुवा, खापर, मोलगी, अशा वनपरीक्षेत्रात साधारण सव्वा तीन लाख वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे असले तरी यंदा आदिवासींना रोजगार देणाºया महुफुले व इतर प्रजातीची रोपे मुबलक प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.