केंद्रीय समितीची नंदुरबार जिल्ह्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:46 PM2019-11-23T12:46:28+5:302019-11-23T12:46:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक पिकांचे नुकसान झाले असतांनाही नुकसानीची पहाणी करण्यासाठी राज्यात आलेल्या ...

Back to Central Committee Nandurbar District | केंद्रीय समितीची नंदुरबार जिल्ह्याकडे पाठ

केंद्रीय समितीची नंदुरबार जिल्ह्याकडे पाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक पिकांचे नुकसान झाले असतांनाही नुकसानीची पहाणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय समितीने जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. शेजारच्या धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यात पथकाने भेटी दिल्या आहेत. राजकीय नेते आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच केंद्रीय समिती जिल्ह्यात येवू शकली नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्यापासून अनेक गावे व शेतकरी सुटले असल्याची ओरड आजही कायम आहे. 
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतीचे नुकसान झाले होते. शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वेळेवर आणि पुर्ण पंचनामे करावे अशी मागणी शेतक:यांनी लावून धरल्यावर 33 टक्केपेक्षा अधीक नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. त्यात सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्र बाधीत झाल्याचा अहवाल  प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार 30 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती.
केंद्रीय समिती राज्यात नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी केंद्राची समिती राज्यात दाखल झाली आहे. समितीचे एक पथक उत्तर महाराष्ट्रातील नुकसानीची पहाणी करीत आहे. शुक्रवार आणि शनिवारी ही समिती पहाणी करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात या समितीच्या पथकाने पहाणी केली. परंतु समितीच्या दौ:यात नंदुरबार जिल्हा वगळण्यात आला आहे. जिल्ह्यातील नुकसानीची टक्केवारी ही अत्यल्प असल्यामुळे नियोजनानुसार जिल्हा वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण  प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. 
असे होते नुकसान नंदुरबार तालुक्यात एकूण 55़57 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आह़े यातून 78 शेतक:यांना 5 लाख रुपयांची मदत प्रस्तावित आह़े कोरड क्षेत्रात 52 तर फळपीक धारक 27 शेतक:यांचा समावेश आह़े 
नवापुर तालुक्यात 1 हजार 593 शेतक:यांच्या 506़25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आह़े यासाठी 34़58 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आह़े 1 हजार 589 शेतकरी हे कोरडवाहू क्षेत्रधारक तर 4 शेतकरी फळपिकधारक आहेत़ अक्कलकुवा तालुक्यात तब्बल 1 हजार 869 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े 3 हजार 965 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसल्याने त्यांना 1 कोटी 27 लाख 28 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आह़े शहादा तालुक्यात 2 हजार 68 शेतक:यांच्या 1 हजार 576 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 4 लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आह़े तालुक्यात 2 हजार 58 कोरडवाहू शेतक:यांचे नुकसान झाले आह़े धडगाव तालुक्यात 3 हजार 173 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसला आह़े यातून 1 हजार 857 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 26 लाख 36 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आह़े तळोदा तालुक्यात 8 शेतक:यांच्या 4 हेक्टरचे नुकसान झाले आह़े शेतक:यांमध्ये नाराजी पथकाने जिल्ह्यात नुकसानीची पहाणी करणे टाळल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागातील शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. फळ पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय समिती जिल्ह्यात आली असती तर शेतक:यांना तेव्हढा दिलासा मिळाला असता. परंतु समितीनेही त्याकडे पाठ फिरविली. मदत सरसकट राहणार केंद्रीय समितीच्या दौ:यानंतर जो अहवाल दिला जाईल त्यानुसार राज्याला सरसकट मदत दिली जाणार आहे. त्यामुळे एका जिल्ह्यावर    अन्याय व दुस:या जिल्ह्याला झुकते माफ असला प्रकार राहणार नाही. 

Web Title: Back to Central Committee Nandurbar District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.