रेल्वे स्थानकावर अस्ताव्यस्त पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST2021-09-09T04:37:27+5:302021-09-09T04:37:27+5:30
मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली नंदुरबार : शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून, विविध भागात मोकाट कुत्र्यांची टोळी भटकंती ...

रेल्वे स्थानकावर अस्ताव्यस्त पार्किंग
मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली
नंदुरबार : शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून, विविध भागात मोकाट कुत्र्यांची टोळी भटकंती करत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच लहान मुलांना या कुत्र्यांची भीती निर्माण झाली आहे. पालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बाजारात टोमॅटोचे भाव घसरले
तळोदा : बाजारामध्ये भाजीपाला आवक वाढल्यामुळे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांचा खर्च निघणे कठीण झाले आहे. टोमॅटोच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने उत्पादक हैराण झाला आहे. शहरातील मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाव कमी झाले आहेत. ३० रूपये प्रति किलो जाणारे टोमॅटो आता १० रूपये प्रति किलोने विक्री करावे लागत आहेत. शासनाने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्यांना हमीभाव द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.