भजनी मंडळाकडून गावात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:53+5:302021-09-02T05:05:53+5:30

तळोदा तालुक्यातील लोभाणी येथे भातीजी महाराज भजनी मंडळातर्फे नियमित भजन कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यात येत असतात. भजनी मंडळाच्या माध्यमातून गावात ...

Awareness in the village from Bhajani Mandal | भजनी मंडळाकडून गावात जनजागृती

भजनी मंडळाकडून गावात जनजागृती

तळोदा तालुक्यातील लोभाणी येथे भातीजी महाराज भजनी मंडळातर्फे नियमित भजन कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यात येत असतात. भजनी मंडळाच्या माध्यमातून गावात आध्यत्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. येथे गेल्या ५० वर्षांपासून या मंडळाचे कार्य सुरू असून, परिसरात कुणाकडेही सुख-दुःखाच्या प्रसंगी धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सवात कुठलाही मोबदला न घेता हे भजनी मंडळ सहभागी होते. दरम्यान, भजनी मंडळाकडून युवकांना विशेषकरून व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असल्यास युवकांनी व्यसनापासून दूर राहायला हवे, असे सांगण्यात येत आहे. सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेली असल्याने गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

लोभाणी येथील भातीजी महाराज भजनी मंडळात गायक गणेश नाईक, दिलवर पाडवी, हार्मोनियम वादक दिलीप पाडवी, नीलेश पाडवी, तबलावादक दिलवरसिंग पाडवी, मृदंगवादक लाश्या प्रधान, सहकलाकार जयसिंग पाडवी, गुलाब पाडवी, अशोक पाडवी, शरद पाडवी यांचा समावेश आहे.

Web Title: Awareness in the village from Bhajani Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.