भिंतीवरची शाळा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:10+5:302021-02-05T08:11:10+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण सुरू केले. ...

भिंतीवरची शाळा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण सुरू केले. मात्र ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची स्मार्टफोन घेण्याचीही परिस्थिती नाही. त्यातच येथे नेटवर्कची रेंजही अनेकदा गायब असते. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले ऑनलाइन शिक्षणापासून दूरच असल्याचे दिसते. परंतु ब्राह्मणपुरी येथील जि.प. शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून येथील शिक्षकांनी कंबर कसली आहे. केंद्रप्रमुख श्यामराव ईशी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणपुरी येथील मुख्याध्यापक संतराम राठोड, शिक्षक आजीनाथ घुले, शिवाजी पाडवी, जगदीश वसावे, शहनाज पटेल या शिक्षकांनी स्वखर्चाने गावातील दाट वस्ती असलेल्या ठिकाणी भिंतीवर अभ्यास रेखाटून ‘भिंतीवरची शाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे गल्लीबोळातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे.