खतांच्या योग्य वापराबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:12 IST2019-11-02T13:12:36+5:302019-11-02T13:12:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोळदे येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे ‘खताचा ...

खतांच्या योग्य वापराबाबत जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील कोळदे येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे ‘खताचा योग्य वापर’ हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कृषी, सहकार व कृषी कल्याण मंत्रालय आणि रसायन व खते मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतात खत वापराबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी नंदुरबार कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी. खरबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील, जि.प.चे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील होते. नंदुरबार येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे डॉ.डी.बी. अहिरे, प्रा.दिनेश सूर्यवंशी, प्रा.बागूल उपस्थित होते. या वेळी डॉ.एस.बी. खरबडे यांनी फायदेशीर शेतीसाठी खताचा कार्यक्षम वापर आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी खत पिकाच्या गरजेनुसार, योग्य मात्रेत, योग्य ठिकाणी, योग्य स्वरुपात, योग्यवेळी दिल्यास पिकांचे उत्पादन वाढून उत्पन्नात भर पडेल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील यांनी कृषी विभागामार्फत राबविलेल्या अत्यंत महत्वपूर्ण अशा ‘मृदा पत्रिका’ अभियानाची माहिती दिली. जि.प.चे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांनी जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे महत्व सांगून एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. कृष्णदास पाटील यांनी शेतक:यांनी खताचा कार्यक्षम वापर करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या वेळी तांत्रिक सत्रात कृषी महाविद्यालयाचे डॉ.डी.बी. अहिरे यांनी खताच्या वापराच्या विविध पद्धती, महत्व तसेच ठिबक सिंचनाद्वारे खताचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ उमेश पाटील यांनी माती परीक्षणाचे महत्व सांगून त्यावर आधारीत खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनात व उत्पन्नात होणा:या वाढीबाबत माहिती दिली. या कार्यक्रमात सुनहरा कल-आयटीसीचे अमोल साखरकर, राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्सचे अन्सारी यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी शेतक:यांना दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. तसेच खताच्या संतुलित आणि एकात्मिक व्यवस्थापनाबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. पिकांना खते देण्यासाठी उपयुक्त असणा:या बैलचलीत आणि मनुष्यचलीत अवजारे व यंत्राबाबत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ पद्माकर कुंदे यांनी आभार मानले.