नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 09:00 PM2020-10-21T21:00:07+5:302020-10-21T21:00:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘कायाकल्प पुरस्कार’ उपक्रमात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाने २०१९-२० मध्ये राज्यात ...

Award to Nandurbar District Hospital | नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला पुरस्कार

नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला पुरस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘कायाकल्प पुरस्कार’ उपक्रमात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाने २०१९-२० मध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. नुकतेच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. 
शासकीय रुग्णालयातील स्वच्छता व व्यवस्थापनावर आधारीत मुल्यांकन करून या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. राज्यातील नाशिक जिल्हा रुग्णालय ९७.५५ टक्के गुणांसह प्रथम, मालेगाव शासकीय रुग्णालय ९१.६७ टक्के गुणांसह दुसऱ्या आणि नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालय ९१.१५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१८-१९ मध्ये  पुरस्कार मिळविला आहे. जाहीर झालेल्या पुरस्कारात उपजिल्हा  रुग्णालय गटात नवापूर आणि ग्रामीण रुग्णालय खोंडामळी ता. नंदुरबार यांचाही पुरस्काराच्या  यादीत समावेश आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्र गटात लहान शहादा, नटावद, चिंचपाडा आणि कहाटूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयाला जाहीर झालेला पुरस्कार उत्साह वाढविणारा असल्याची प्रतिक्रीया जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. भोये यांनी दिली आहे. 

Web Title: Award to Nandurbar District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.