उमराणी येथे पारितोषिक वितरण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST2021-03-26T04:30:04+5:302021-03-26T04:30:04+5:30

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. राजपूत, धनाजे केंद्रशाळेचे शिक्षक बी. डी. ...

Award Ceremony at Umrani | उमराणी येथे पारितोषिक वितरण कार्यक्रम

उमराणी येथे पारितोषिक वितरण कार्यक्रम

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. राजपूत, धनाजे केंद्रशाळेचे शिक्षक बी. डी. पाडवी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोना काळात राशिमा फाऊंडेशनच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा गाैरव या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी बोलताना विस्तार अधिकारी राजपूत यांनी उमराणी गावात विविध अभ्यास गटांच्या माध्यामातून शिक्षण देण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगत चेतन पावरा, दिलीप पावरा व तेगा पावरा यांनी मुलांना पुस्तकी व नैतिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण दिल्याने त्यांचे काैतुक केले.

गटशिक्षणाधिकारी चाैरे यांनी सांगितले की, सर्वच शाळांचे, शाळा सुरू ठेवण्याचे एक वेळापत्रक असते. त्या वेळापत्रकाप्रमाणे त्या चालतात. परंतु काल्लेखेतपाडा, उमराणी येथील शाळा ह्या अविरत सुरू आहेत. या शाळांचे शिक्षक शाळा सुटल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत पायी चालत, विंचू-काट्याची पर्वा न करता विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मुलांना शिक्षण वजा मार्गदर्शन करतात. मुख्याध्यापक रुपेशकुमार नागलगावे, लक्ष्मीपुत्र उप्पीन, दशरथ पावरा, तेगा पावरा यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक यांचाही शिक्षणाच्या बहुमोल कार्यात मोलाचा वाटा आहे.

विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. कोविड नियमांचे पालन करीत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत हा कार्यक्रम झाला. यावेळी राशिमा फाऊंडेशनच्या अध्यक्षा मालती पावरा, वंतीलाल पावरा, हेमा पावरा, आकाश पावरा, चिवलीबाई पावरा व पालक उपस्थित होते. यशस्वितेसाठी अजित पावरा, गोपाल पावरा, चेतन पावरा, दिलीप पावरा, बिभीषण पावरा, मनोज पावरा, अमर चव्हाण, संतोष पावरा, चिमा पावरा व शाळेतील विद्यार्थ्यांना परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. शिवाजी पावरा यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मीपुत्र उप्पीन यांनी केले तर आभार राधा पावरा ह्या विद्यार्थिनीने मानले.

Web Title: Award Ceremony at Umrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.