मोडवींकडून ‘डाब राजमंडल’वर जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:51 IST2020-02-24T13:51:35+5:302020-02-24T13:51:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : याहा मोगी यात्रेनिमित्त सातपुड्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून मोलगी, डाब व गुजरातमधील देवमोगरा ...

Awakening from 'Modavi' to the Dab Rajamandal | मोडवींकडून ‘डाब राजमंडल’वर जागर

मोडवींकडून ‘डाब राजमंडल’वर जागर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : याहा मोगी यात्रेनिमित्त सातपुड्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून मोलगी, डाब व गुजरातमधील देवमोगरा येथे नवस फेडणे व दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. दर्शनासाठी निघतांना व यात्रेहून परतल्यानंतर परंपरेनुसार मोडवी व पुंजारा यांच्याकडून ‘डाब राजमंडल’ वर आधारित मौखिक कथेबाबत जागर होत आहे.
निसर्गपूजक आदिवासी बांधवांच्या प्रतिक्षेतील याहा मोगी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानिमित्त मौखिक साहित्य परंपरा जतन करण्याचे कार्य आदिवासींमधील पुंजारा, बोडवा व मोडवी यांनी केले असून ही परंपरा सांस्कृतिक व जीवनमुल्यांच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे ते पटवून देत आहे. त्यात डाब राजमंडलातील राजे व जनता समुहाने भटकंती करून जंगलातील कंदमुळे, फळ-फुल गोळा करीत होते. यासह दाब मंडळातील कोलपासा, देवगोंदारी, विन्यादेव, राजापांठा, तारहामहल, उमरावाणू, हेलबदेव, आगीपांडर, गिंबदेव, पोरबदेव, सिडगोवा, बाबा बाहगोºया या देवतांचा परिचय करुन देत सामुहिक जीवन व शेती करण्याच्या पद्धती मौखिक परंपरेनुसार सांगण्यात येत आहे. शिवाय याहा मोगी मातेच्या जन्मापासून विवाहापर्यंतचा प्रवासावर कथा मांडल्या जात आहे.


४याहा मोगी माता यात्रेनिमित्त होणाऱ्या पूजाविधींमध्ये आदिवासी बांधवांकडून डाब राजमंडल संबंधित पूजेला अधिक महत्व दिले जात आहे. त्यात मोरखी येथील देवकाटण, घाणीखुट, भिलट यांसह अक्कलकुवा तालुक्यातील मोकस येथे सिडगोवा, सरी येथे बाबा बाहगोºया, बाबा काटाला (पिंपळखुटा पसिर) येथे राणी फुलहर, अलिराजपूर (जलहिंदी परिसर) येथे राणीकाजल या पूजाविधी सुरुवात झाली आहे.
४सातपुड्यातील सात संस्थांनापैकी एक असलेल्या सागबारा येथील राजगादीचे पूजन हे या मोगी मातेच्या नावानेच करण्यात येत आहे.

Web Title: Awakening from 'Modavi' to the Dab Rajamandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.