आज ‘व्यायाम’वर होणार जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:26 IST2020-02-01T13:26:06+5:302020-02-01T13:26:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त जिल्ह्याती विविध शाळा-महाविद्यालय व क्रीडा कार्यालयामार्फत व्यायाम व योगाच्या जनजागृतीसाठी विविध ...

आज ‘व्यायाम’वर होणार जागर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त जिल्ह्याती विविध शाळा-महाविद्यालय व क्रीडा कार्यालयामार्फत व्यायाम व योगाच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जी. टी. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात १ फेबुवारी रोजी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही कार्यक्रम होणार आहे.
व्ही.के.शाह विद्यालय, शहादा
सुदृढ आरोग्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व आहे. म्हणून शहादा येथील सन्मित्र बहुउद्देशीय क्रीडा मंडळ व शेठ व्ही.के. शाह विद्यालयातर्फे विश्रामकाका शैक्षणिक संकुलात सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम राबविण्यात आला.
मकरसंक्रांत ते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा खास कालखंड. समस्त प्राणीमात्रांच्या उर्जेचे स्त्रोत म्हणजे सूर्य. सूर्याच्या उपासनेचे व निरोगी जीवनाचे विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावेत, आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान निर्माण व्हावा हा यामागील उद्देश होता. त्यात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने शिस्तबद्धरित्या सहभाग नोंदवला. प्राचार्य सी.व्ही. चौधरी, सन्मित्र बहुउद्देशीय क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एस.डी. भोई, पर्यवेक्षक आय.एन. चौधरी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शोभना पाटील, विकास प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक विशाल तांबोळी आदी उपस्थित होते.