औरंगाबाद-अहमदाबाद बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:51 PM2019-11-10T12:51:04+5:302019-11-10T12:51:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : अक्कलकुवामार्गे अहमदाबादकडे जाणारी औरंगाबाद-अहमदाबाद या बसचा शनिवार कुकरमुंडा फाटय़ाजवळ अपघात झाला. या वेळी समोरून ...

Aurangabad-Ahmedabad bus accident | औरंगाबाद-अहमदाबाद बसचा अपघात

औरंगाबाद-अहमदाबाद बसचा अपघात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : अक्कलकुवामार्गे अहमदाबादकडे जाणारी औरंगाबाद-अहमदाबाद या बसचा शनिवार कुकरमुंडा फाटय़ाजवळ अपघात झाला. या वेळी समोरून येणा:या वाहनाच्या तीव्र प्रकाश व खड्डय़ामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ही बस रस्त्यावरुन खाली उतरली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
याबाबत असे की, अक्कलकुवामार्गे अहमदाबादकडे जाणारी बस क्रमांक एमएच 20, बीएल 4060 ही पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास तळोद्याहून अक्कलकुवामार्गे अहमदाबादकडे मार्गस्थ झाली. ही बस तळोदा ते अक्कलकुव्या दरम्यान असणा:या कुकरमुंडा फाटय़ाजवळ आली असता समोरून येणा:या वाहनांच्या लाईटच्या तीव्र प्रकाशामुळे बस चालकाला रत्यावरील मोठमोठे खड्डे पाहण्यास त्रास झाला. त्यामुळे बस खड्डय़ात गेल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्यावरून उतरून शेजारील चारीत गेल्याने अपघात घडला. हा अपघात पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडल्यामुळे बसमध्ये 14 प्रवाशी होते. त्यापैकी कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याची       माहिती बसचे वाहक डी.के. दिळवणे व चालक युवराज चव्हाण यांनी  दिली.
बसचा वेग कमी असल्याने व झाडांमुळे बस  चारीतील खोल भागात उतरली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अपघाताची माहिती मिळताच अक्कलकुवा आगाराचे वाहतूक निरीक्षक सचिन पाटील, वाहन परिक्षक डी.के. चित्ते, वाहतूक नियंत्रक के.एस. वसावे हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी अपघातग्रस्त बसचा पंचनामा केला.
दरम्यान नेत्रंग ते शेवाडी राष्ट्रीय महामार्गावरील तळोद्यापासून गुजरातकडे जाणा:या रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाली असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डय़ांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, वाहनधारकांना खड्डे टाळता टाळता नाकी नऊ येत आहे. या मार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून, या मार्गावरील खड्डे मातीने बुजविण्यात आली असल्याने मोठय़ा प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरते. रात्रीच्या वेळी तर या मार्गावरील वाहतूक धोकेदायक ठरत आहे.

Web Title: Aurangabad-Ahmedabad bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.