डॉक्टरांनी तयार केलेल्या लघुपटास प्रेक्षकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:55 IST2019-11-18T12:55:10+5:302019-11-18T12:55:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डॉ.सुजित पाटील लिखित व दिग्दर्शीत ‘काश..’ या लघुपटाला शहरातील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

डॉक्टरांनी तयार केलेल्या लघुपटास प्रेक्षकांचा प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : डॉ.सुजित पाटील लिखित व दिग्दर्शीत ‘काश..’ या लघुपटाला शहरातील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात हा लघुपट दाखविण्यात येणार आहे.
नंदुरबारच्या डॉक्टरांसह अन्य क्षेत्रातील कलावंतांच्या सहभागाने तयार झालेल्या या लघुपटात डॉक्टरांवर दाखविण्यात येणा:या अविश्वासावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. खासदार डॉ.हीना गावित यांनी हा लघुपट उत्तम संदेश देणारा असल्याची प्रतिक्रीया दिली. शहरातील अमर चित्रमंदिरात सकाळी 9 वाजेला या हिंदी भाषिक संदेश देणा:या लघूपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी हजेरी लावली. रणजित राजपूत, डॉ. रोशन भंडारी, डॉ.राजकुमार पाटील, डॉ. प्रकाश ठाकरे व जय देसाई यांच्या प्रमुख भुमिका या लघूपटात आहेत. पाहूणे कलाकार म्हणून पुनम भावसार आहेत. मानसिंग राजपूत यांनी उत्तम कॅमेरा हाताळला. शिवानी परदेशी यांनी नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम पाहिले आहे. तसेच तांत्रिक काम बंगलोर, मुंबई येथे करण्यात आले. खुशालसिंग राजपूत, सिमा मोडक यांच्यासह अजय वळवी, रवि सुर्यवंशी, शशी हनुवटे, डॉ. सचिन खलाणे, गिरीष तांबोळी, किरण जगदेव, राहूल वसावे, माधूरी सुर्यवंशी,प्रकाश धनगर आदींनी भूमिका वठवल्या आहेत.