तीन वाळू घाटापैकी अवघ्या एका घाटाचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST2021-03-05T04:31:35+5:302021-03-05T04:31:35+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा तीन वाळू घाटाचा लिलावासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु केवळ एकाच घाटाचा लिलाव झाला. गेल्या ...

तीन वाळू घाटापैकी अवघ्या एका घाटाचा लिलाव
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा तीन वाळू घाटाचा लिलावासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु केवळ एकाच घाटाचा लिलाव झाला. गेल्या तीन वर्षांपासून दोन किंवा तीन घाटांचाच लिलाव होत आहे. असे असतांनाही जिल्ह्यात सद्या मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होत आहे.
जिल्ह्यात एकुण १६ वाळू घाट आहेत. त्यातील १० घाट हे तापी नदीवरील आहेत. याशिवाय रंगावली, गोमाई नदीवरील वाळू घाटांचा समावेश आहे. यंदा तीन वाळू घाटांची निविदा काढण्यात आली होती. त्यापैकी केवळ एका वाळू घाटाचा लिलाव होऊ शकला इतर दोन घाटांसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्याला देखील कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता लक्ष लागून आहे.
दरम्यान, जिल्ह्यात केवळ एकच वाळू घाट असतांना वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक जिल्ह्यात होत आहे.