शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:35 IST2021-08-13T04:35:00+5:302021-08-13T04:35:00+5:30

दरम्यान, आठवीच्या वर्गातील दोन हजार ५१२ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होते. यासाठी एकूण २८ केंद्र जिल्ह्यात तयार करण्यात आले ...

Attendance of five thousand students for the scholarship examination | शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

दरम्यान, आठवीच्या वर्गातील दोन हजार ५१२ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होते. यासाठी एकूण २८ केंद्र जिल्ह्यात तयार करण्यात आले होते. नंदुरबार १२, नवापूर ४, शहादा ६, तळोदा २, अक्कलकुवा ३ तर धडगाव तालुक्यात एक केंद्र नियुक्त होते. या केंद्रांवर दोन हजार ३०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेला २११ विद्यार्थी गैरहजर होते.

दीड वर्षांपासून घरूनच शिक्षण घेणारे विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेच्या निमित्ताने बाकावर बसल्याचे दिसून आले. कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी उपाययोजनांचा आधार घेतला होता. शाळांमध्ये आलेले बहुतांश विद्यार्थी हरखून गेले होते. दीड वर्षांनी मित्रमैत्रिणींची भेट झाल्याने त्यांच्या चैतन्यही होते. प्रत्येक बाकावर एक याप्रमाणे रचना करून शिक्षण विभागातर्फे ही परीक्षा घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Attendance of five thousand students for the scholarship examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.