चोरीची दुचाकी विक्रीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:04 IST2020-02-09T12:04:03+5:302020-02-09T12:04:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चोरीची दुचाकी कमी किंमतीत विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास एलसीबीच्या पथकाने नंदुरबारातील नवापूर चौफुलीवर पकडले. ...

Attempts to sell a stolen bike failed | चोरीची दुचाकी विक्रीचा प्रयत्न फसला

चोरीची दुचाकी विक्रीचा प्रयत्न फसला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चोरीची दुचाकी कमी किंमतीत विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास एलसीबीच्या पथकाने नंदुरबारातील नवापूर चौफुलीवर पकडले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दुचाकी चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गोरख राजेंद्र ठाकरे, रा.पाटीलपाडा, ता.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. शहरातील नवापूर चौफुली भागात एकजण नवी दुचाकी कमी किंमतीत विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली. त्यांनी लागलीच गस्तीवर असलेल्या पथकाला नवापूर चौफुली भागात पाठविले. माहिती मिळालेल्या व्यक्तीच्या वर्णनाशी मिळताजुळता वर्णन असलेली व्यक्ती या भागात फिरतांना आढळली. त्याच्याकडे पल्सर दुचाकी होती. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असता त्याने माहिती दिली.
दोन महिन्यांपूर्वी नंदुरबारातून ही दुचाकी चोरल्याचे त्याने कबूल केले. घटना जुनी झाल्याने आता ही दुचाकी आपण विक्रीसाठी काढली होती. जेवढी किंमत येईल तेवढी घेवून दुचाकीची विल्हेवाट लावण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले. पथकाने त्याला ताब्यात घेवून शहर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याकडून चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार संजय वाघ, प्रमोद सोनवणे, बापू बागुल, दादाभाई मासुळे, राकेश मोरे, मनोज नाईक, किरण मोरे, राजेंद्र काटके, अभय राजपूत, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली.
दरम्यान, जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. महिन्याला सरासरी दिवसाआड एक दुचाकी चोरी होण्याची घटना जिल्ह्यात घडत आहे. यामुळे दुचाकी मालक मोठ्या प्रमाणावर हैराण झाले होते. एकाच शहरात किंवा एकाच भागात चोरीच्या घटना होण्याऐवजी संपुर्ण जिल्ह्यात आणि ग्रामिण भागात देखील या घटना घडत असल्यामुळे चोरट्यांचे जाळे किती आणि कसे विस्तारले आहे याबाबत चर्चा होत होती. १५ दिवसांपूर्वी एलसीबीने सातपुड्याच्या दुर्गम भागात एकाला चोरीच्या १८ दुचाकीसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर चोरीच्या घटना उघडकीस येवू लागल्या आहेत.

Web Title: Attempts to sell a stolen bike failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.