चालकाचा खून करुन ट्रकमधील मालविक्रीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:13 IST2019-12-26T12:13:29+5:302019-12-26T12:13:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुरतकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचा सहचालकाने गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली़ ...

Attempts to murder a driver and sell goods in the truck | चालकाचा खून करुन ट्रकमधील मालविक्रीचा प्रयत्न

चालकाचा खून करुन ट्रकमधील मालविक्रीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुरतकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचा सहचालकाने गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली़ खूनाच्या घटनेनंतर खून करणाºया सहचालकाने ट्रकमध्ये भरलेल्या सळया विक्री करण्यासाठी धुळ्यातील व्यापाऱ्यांसोबत संपर्क केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे़
इंद्रदेव ओमप्रकाश यादव (२४) रा़ सुलतानपूर, उत्तरप्रदेश असे मयत चालकाचे नाव असून २२ डिसेंबर रोजी जालना येथून सळईने भरलेला ट्रक घेऊन तो सुरतकडे निघाला होता़ दरम्यान जळगाव जिल्ह्यातील मार्गावर त्याला सुरत येथे सोबतच काम करणारा मानसिंग पटेल रा़ उत्तरप्रदेश हा भेटला होता़ तेथून दोघेही सोबत धुळे मार्गाने सुरतकडे रवाना झाले होते़ परंतू ट्रक नवापुर तालुक्यात शिवारात आल्यानंतर मानसिंग पटेल याने इंद्रदेव यादव याचा गळा दाबून खून केला होता़ ट्रकमधील सळई विक्री करुन आर्थिक फायदा करुन घेण्याच्या उद्देशाने मानसिंग याने हे कृत्य केले होते़ खूनाच्या घटनेनंतर त्याने ट्रकमधील सळईचा सौदा करण्यासाठी धुळे येथील एका भंगार व्यापाºयासोबत संपर्क केला होता़ परंतू सौदा होऊ शकला नाही यामुळे त्याने ट्रकमध्येच ठेवलेला इंद्रदेवचा मृतदेह मोरकारंजा शिवारातील नाल्यात फेकून दिला़ घटनेनंतर मानसिंग याने ट्रक सोनखांब शिवारात आणून एका हॉटेलसमोर उभा करुन पळ काढला होता़ याचदरम्यान ट्रान्सपोर्ट मालक सुनील गुप्ता यांनी ट्रकचा शोध घेत सोनखांब शिवारात आल्यानंतर खून आणि ट्रकचोरीचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला़
याप्रकरणी सुनिल गिरधारीलाल गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मानसिंग पटेल याच्याविरोधात विसरवाडी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे करत आहेत़ फरार मानसिंगचा पोलीसांकडून शोध सुरु आहे़

Web Title: Attempts to murder a driver and sell goods in the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.