परराज्यात अडकलेल्यांना आणण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:22 IST2020-04-30T12:22:20+5:302020-04-30T12:22:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्याबाहेर अडकलेले कामगार, मजूर, विद्यार्थी यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबधितांच्या नातेवाईकांनी, पालकांनी ...

परराज्यात अडकलेल्यांना आणण्यासाठी प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्याबाहेर अडकलेले कामगार, मजूर, विद्यार्थी यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबधितांच्या नातेवाईकांनी, पालकांनी यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील कोरोना विषाणू उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध ठिकाणी रोजगार, शिक्षण, वैद्यकीय व इतर कामासाठी गेलेले बांधव लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यात अडकून पडलेले आहेत. या सर्व मजूर, विद्यार्थी, वैद्यकीय व इतर कामांसाठी गेलेल्या बांधवांना राज्यात आणण्याची विनंती आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी केली आहे. अशा सर्व मजूर, विद्यार्थी, आरोग्य व इतर कामासाठी गेलेल्यांनी आपले नाव, ते कुठे आहेत त्या गावाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव तसेच शक्य असल्यास स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा.
यातून त्यांना नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या गावी यायचे आहे, त्या गावांच्या नावांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शरद राठोड (८८८८५६५८१७) व अशोक बेहेरे (९०४९९६०३९७)यांच्याकडे संपर्क साधावा.
नोंदणी केल्यास मजुर, विद्यार्थी, वैद्यकीय व इतर कामांसाठी गेलेल्यांना त्यांच्या गावाला आणण्याची व्यवस्था करता येईल. यासंदर्भात आ.डॉ.विजयकुमार गावित यांचे मुख्यमंत्री कार्यालयाशी व सचिव यांच्याशी संपर्क साधून बोलणे केले आहे.
याकामी कार्यकर्त्यांनीही संबंधित राज्यात किंवा जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, वैद्यकीय व इतर कामांसाठी गेलेल्यांशी संपर्क साधावा आणि याबाबतची संपूर्ण कार्यवाही करावी, असे आवाहन आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी केले आहे.