सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:12+5:302021-08-01T04:28:12+5:30
सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी सायंकाळी औषधी ठेवलेल्या कपाटाच्या काचा फुटण्याचा आवाज आला. यावेळी येथील निवासस्थानात राहणाऱ्या महिला शिपाई ...

सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरीचा प्रयत्न
सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी सायंकाळी औषधी ठेवलेल्या कपाटाच्या काचा फुटण्याचा आवाज आला. यावेळी येथील निवासस्थानात राहणाऱ्या महिला शिपाई कोमल माळी यांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली असता तिघे चाेरटे त्यांना पाहून पळून गेले. कोमल माळी यांनी यांनी आतमध्ये जाऊन पाहणी करीत औषध विभागातील कपाटाचा काच फुटलेल्या अवस्थेत आढळून आला त्याच बरोबर प्रसूती कक्षात प्रसूती दरम्यान वापरण्यात येणाऱ्या साधनांची नासधूस केल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पटेल यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. यानंतर डॉ. सचिन पटेल व औषध निर्माण अधिकारी मधुकर पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाणे गाठत संबंधित अज्ञान चोरट्यावर गुन्हा दाखल केला .
एका शिपायावर भर
प्राथमिक आरोग्य केंद्र सुलवाडे येथे एकूण चार शिपायाच्या जागा असून त्यापैकी तीन जागा रिक्त आहेत. यामुळे एकाच महिला शिपायावर केंद्राच्या सुरक्षेचा भार आहे.
दरम्यान सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी माळी यांच्या पतीची मोटारसायकल आवारात उभी असताना चोरट्यांनी त्याचे चाक व डिस्क काढून पलायन केले.
भरदिवसा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रवेश करून कपाटाच्या काचा फोडत सामानाची नासधूस केल्याची घटना घडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी संबंधित चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे.