आरटीओ कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 22:02 IST2020-11-04T22:01:48+5:302020-11-04T22:02:01+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने कुटूंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी ...

Attempted self-immolation at RTO office | आरटीओ कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

आरटीओ कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने कुटूंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला. आत्मदहन करणा-या कुटूंबावर तातडीने नियंत्रण मिळवता आल्याने अनुचित प्रकार टळला आहे. 
शनीमांडळ ता. नंदुरबार येथील अशोक मोतीराम पाटील यांचा ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून साडेचार लाख रूपयांचा दंड करण्यात आला होता. दरम्यान त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी दंड भरू शकणार नसल्याचे संबधित अधिका-यांना कळवले होते. परंतू कार्यालयाने सातत्याने तगादा लावल्याने अशोक पाटील हे त्रस्त झाले होते. त्यांनी सोमवारी पत्नी व मुलांसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल होत एका खोलीत कुटूंबिय व स्वत:ला बंद करुन घेतले होते. या खोलीत आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिल्यानंतर कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची एकच धावपळ उडाली होती. अधिका-यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी घटनास्थळी धाव घेत अशोक पाटील याची समजूत काढत त्यांना बाहेर काढले होते. २०१९ पासून पाटील हे वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी कार्यालयात चकरा मारत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे. प्रकरणाच्या चाैकशीसाठी वाहन निरीक्षक गिरीष पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  दरम्यान याबाबत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना संपर्क केला असता,  उपप्रादेशिक परिवहन विभागाने कोणतीही तक्रार दिलेली नसल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती दिली आहे. 

आत्मदहनाची धमकी देणा-या अशोक पाटील यांना वाहनांचा टॅक्स भरायचा नसल्याने ते प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी वाहन निरीक्ष नियुक्ती केले असून ते तपास करत आहेत. 
-नानासाहेब बच्छाव,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

Web Title: Attempted self-immolation at RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.