मोड येथे ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:53+5:302021-09-03T04:31:53+5:30
दरम्यान, रात्रीच्या वेळी तळोदा पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांच्यासह बोरद पोलीस दूरक्षेत्राचे महेंद्र जाधव, छोटू कोळी, नीलेश खोंडे, राजू ...

मोड येथे ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न फसला
दरम्यान, रात्रीच्या वेळी तळोदा पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांच्यासह बोरद पोलीस दूरक्षेत्राचे महेंद्र जाधव, छोटू कोळी, नीलेश खोंडे, राजू जगताप व कर्मचारी गस्त घालत होते. याबाबत पोलीस निरीक्षक पावरा यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, रात्री ट्रॅक्टर चौकात उभा होता; परंतु आम्हाला तसा संशय न आल्याने आम्ही तेथून निघून गेलो. मात्र, संबंधितांनी घटना सांगितल्याने आम्हाला समजले की, रात्री चोरट्यांनी तो चौकात आणून उभा केला होता. त्याच दरम्यान आमची पोलीस व्हॅन त्यांच्या नजरेत पडली असेल व ते तेथेच ट्रॅक्टर सोडून पसार झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, विजय पाटील यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दोन दिवसांपूर्वीच हा ट्रॅक्टर विकत घेतला आहे. परिसरात चोरीच्या घटना नियमित घडत असल्याने मोड येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारून कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.