गोमांस पकडून देणाºयांना मारहाणीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:41 IST2020-09-04T12:40:30+5:302020-09-04T12:41:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील फत्तेपूर येथून शहादा शहरात बेकायदेशीररित्या विनापरवाना गोमांस विक्रीसाठी आणणाऱ्या सहा जणांविरोधात शहादा पोलीस ...

गोमांस पकडून देणाºयांना मारहाणीचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील फत्तेपूर येथून शहादा शहरात बेकायदेशीररित्या विनापरवाना गोमांस विक्रीसाठी आणणाऱ्या सहा जणांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एक रिक्षेसह सुमारे २०० किलो गोमांस जप्त केले आहे. विशेष म्हणजे याबाबत बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांना शहादा पोलिसांच्या ताब्यात देणाºयांना या विक्रेत्यांकडून लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने मारहाण केल्याचा प्रयत्न झाला असल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
शहादा शहरातील पाडळदा चौफुली येथे १ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास रिक्षा (क्रमांक एम.एच.-३९ जे-६७९४) जात असताना रिक्षामधून लालसर पाणी रस्त्यावर पडत असल्याचे दिसल्याने शहरातील सोहेल कादर शेख व जाहेद जहागीर शेख या दोघांना संशय आल्याने त्यांनी रिक्षाचालक जुबेरखान कुरेशी यास रिक्षा थांबवून रिक्षात काय आहे? अशी विचारणा केली असता जुबेर व त्याचे दोन मित्र रिक्षा सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी रिक्षाची तपासणी केली असता रिक्षाच्या चालकाच्या सीटखाली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गोमांस आढळून आले.
शासनाने गोमांस विक्रीवर बंदी घातली असल्याने तुम्ही शहादा शहरात विक्री करण्यास का आणले अशी विचारणा करीत असताना शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील रिजवानखा मुक्तारखा कुरेशी, आमिरखा मुक्तारखा कुरेशी, इरफानखा मुक्तारखा कुरेशी यांनी सोहेल कादर शेख, जहागीर शेख, नगरसेवक रियाज कुरेशी, कामिल कुरेशी, अस्लमखा कुरेशी, इरफान कुरेशी यांच्याशी वाद घालत लाठ्याकाठ्या, लाथाबुक्क्यांनी व धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्याने काही काळ तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर रिक्षाचालक जुबेर व त्याच्या साथीदारांनी रिक्षा सोडून पलायन केले. नंतर सोहेल व नगरसेवक रियाज कुरेशी यांनी ही रिक्षा व गोमांस व मारहाणीत वापरण्यात आलेले शस्त्र पोलीस ठाण्यात आणून जमा केले. पोलिसांनी सर्व वस्तू जप्त केल्या असून मांसाच्या तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक पेंढारकर, पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ.गजानन डहाळे, पशुधन पर्यवेक्षक विकास देवरे, परिचर केतू चकने यांच्या पथकाला पोलीस ठाण्यात पाचारण करुन मांंसाचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
या प्रकरणी शहादा पोलिसात सोहेल कादर शेख याच्या फिर्यादीवरून जुबेरखा करीमखा कुरेशी, फरीदखा करीमखा कुरेशी, सलमानखान सलीमखा कुरेशी (सर्व रा.फत्तेपूर, ता.शहादा), रिजवानखा मुक्तारखा कुरेशी, अमीरखा मुक्तारखा कुरेशी, इरफानखा मुक्तारखा कुरेशी (सर्व रा.गरीब नवाज कॉलनी, शहादा) या सहा जणांविरोधात बेकायदेशीररित्या गोमांस बाळगून त्याची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी तसेच बेकायदेशीररित्या जमाव जमून मारहाण केली याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व सहा आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भदाणे करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून तालुक्याती फत्तेपूर येथे गोमांस व गोवंश यांची विक्री व वाहतूक करण्याचा व्यवसाय खुलेआमपणे सुरु आहे. बेकायदेशीररित्या तालुक्यात व तालुक्याबाहेर हा व्यवसाय सुरू आहे. १ सप्टेंबरला जो काही प्रकार घडला तो शहरातील समव्यवसायिकांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला असून पोलिसांनी आता याप्रकरणी सखोल चौकशी करून यातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.