शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल घरफोड्या चंदू जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील तुलसीविहारातील घरफोडी करणाऱ्या नंदुबारातील अट्टल घरफोड्यास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने अटक केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील तुलसीविहारातील घरफोडी करणाऱ्या नंदुबारातील अट्टल घरफोड्यास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्यावर यापूर्वी देखील आठ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरीतील पाच हजार रुपये जप्त करण्यात आले.
नंदुरबारातील तुलसीविहारात राहणारे मधुकर शेवाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच हजार रुपये रोख व २० हजारांचे दागीने असा एकुण २५ हजारांचा ऐवज चोरी झाला होता. याबाबत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास एलसीबी देखील करीत होती. चोरीचा संशय नंदुरबारातील चिंचपाडा भिलाटीतील चंद्रशेखर नथ्थू मेश्राम उर्फ याच्यावर होता.
त्यानुसार त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. तो बाहेरगावी पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला चिंचपाडा भिलाटीत पाठविले. तेथून तो पसार झाल्याचे लक्षात आल्यावर नवापूर चौफुली व साक्री चौफुलीवर तपास केला असता नवापूर चौफुलीवर तो येणाºया-जाणाºया वाहनांना हात देऊन थांबविण्याचा प्रयत्नात होता.
तेथे पोलीस पथक आल्याचे पहाताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. त्याने चोरीची कबुली देत पाच हजार रुपये काढून दिले.
त्याच्यावर यापूर्वी देखील चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार राकेश मोरे, राकेश वसावे, दादाभाई मासुळ, अभय राजपूत, आनंदा मराठे, राजेंद्र काटके यांनी केली.