नंदुरबारात सात वर्षीय बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:11 IST2019-07-16T13:11:14+5:302019-07-16T13:11:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुधाळे शिवारातील कोकणी हिल परिसरात सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी सकाळी ...

Atrocities on seven-year-old girl in Nandurbar | नंदुरबारात सात वर्षीय बालिकेवर अत्याचार

नंदुरबारात सात वर्षीय बालिकेवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुधाळे शिवारातील कोकणी हिल परिसरात सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी सकाळी 11़30 वाजेच्या सुमारास घडली़ पोलीसांनी संशयितास तात्काळ अटक केली़ 
शकील राहत सय्यद रा़ पटेलवाडी, नंदुरबार असे अत्याचार करणा:या संशयिताचे नाव आह़े सोमवारी कोकणी हिल परिसरातील किरण सोसायटीतील एका घराला रंगकाम करण्यासाठी संशयित शकील गेला होता़ दरम्यान त्याने खेळणा:या सात वर्षीय बालिकेसोबत मैत्री करत काहीतरी अमिष देत सोसायटीतील एका घरात बोलावले होत़े याठिकाणी तिच्यासोबत गैरकृत्य करत अत्याचार केला़ हा प्रकार बालिकेने घरी कळवल्यानंतर तिच्या पालकांसह नातलगांनी संशयिताला लागलीच पकडून चांगलाच चोप दिला़ माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधिक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी घटनास्थळी भेट देत संशयित शकील राहत सय्यद यास ताब्यात घेतल़े त्याच्याविरोधात पोक्सोसह अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास पोलीस उपअधिक्षक रमेश पवार करत आहेत़ शकील सय्यद यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले आह़े त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आह़े 

Web Title: Atrocities on seven-year-old girl in Nandurbar