तोरणमाळचे वातावरण होतेय आल्हाददायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:31 IST2020-06-14T12:31:30+5:302020-06-14T12:31:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळला पावसाची प्रतीक्षा असली तरी ...

तोरणमाळचे वातावरण होतेय आल्हाददायक
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळला पावसाची प्रतीक्षा असली तरी आज दिवसभर आकाशात मोठ्या प्रमाणात पांढरेशुभ्र ढग जमल्याने विलोभनीय दृश्य अनुभवास आले.
दरवर्षी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे पावसाला सुरुवात होते मात्र अद्याप पाऊस झाला नसला तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. आकाशात ररोज काळ्यापांढऱ्या ढगांचे साम्राज्य असते यामुळे संपूर्ण परिसरावर पांढºया शुभ्र धुक्याची चादर निसर्गाने पसरवली असल्याचा अनुभव प्राप्त होतो. आज सकाळी ढगांच्या अनेक छटा आकाशात निर्माण झाल्या होत्या. यामुळे एक विलोभनीय दृश्य आकाशात निर्माण झाले होते. निसर्ग मुक्तहस्तपणे या परिसरावर उधळण करीत असला तरी यंदा पर्यटक नसल्याने पर्यटनाचा हंगाम पूर्णत: निष्फळ ठरला आहे. पर्यटकांना येथे मिळणारे निसर्गाचे स्वरूप पाहण्यासह त्याचा लाभ घेण्याचे सौख्य यंदा मिळालेले नाही. आता पुन्हा पर्यटकांचे पाय इकडे वळू लागणार असून स्थानिकांना त्याची प्रतिक्षा आहे.