एटीएम फोडीप्रकरणी चौघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:08 IST2019-07-05T12:08:40+5:302019-07-05T12:08:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील परदेशी गल्लीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करुन पोलीसावर हल्ला करणा:या तिघे व त्यांना आश्रय ...

ATM fraud case confessed to four | एटीएम फोडीप्रकरणी चौघांना कोठडी

एटीएम फोडीप्रकरणी चौघांना कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरातील परदेशी गल्लीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करुन पोलीसावर हल्ला करणा:या तिघे व त्यांना आश्रय देणा:या एकास न्यायालयाने 9 जुलैर्पयत पोलीस कोठडी सुनावली आह़े चौघांना दुपारी अक्कलकुवा न्यायालयात हजर करण्यात आले होत़े 
जुबेर उर्फ ताहीर नुर मोहमद, सुरजपाल धर्मपाल भारद्वाज दोघे रा़ हरियाणा व रमजान भप्पु सक्का रा़ राजस्थान या तिघांना बुधवारी पोलीस पथकाने मोठी राजमोही येथून ताब्यात घेतले होत़े त्यांनी एटीएम फोडीचा प्रयत्न केल्याची कबुली देत गुन्ह्यातील साथीदारांची नावे सांगितली होती़ त्यांना आश्रय देणा:या फय्याज गुलामअली मक्राणी यालाही नाशिक येथून ताब्यात घेतले होत़े या चौघांना न्यायालयाने कोठडी सुनावली़ 
दरम्यान घटनेतील फरार संशयित जमशेद उर्फ जाहिदखान, मुकीतखान व  संदीप शर्मा तिघे रा़ हरियाणा यांचा पोलीस पथक शोध घेत आह़े त्यांच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या आदेशाने जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, मुकेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश तावडे, खुशाल माळी, सुनील पाडवी, विजय विसावे, यशवंत वसावे हे घटनेचा तपास करत आहेत़ 
 

Web Title: ATM fraud case confessed to four