शहरात एटीएम सेंटर्स प्रतिबंधात्मक उपायांविनाच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:37 IST2020-07-10T12:35:46+5:302020-07-10T12:37:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळता यावा यासाठी शासन आणि प्रशासन यांनी विविध मार्गदर्शक सूचनांचे ...

शहरात एटीएम सेंटर्स प्रतिबंधात्मक उपायांविनाच सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळता यावा यासाठी शासन आणि प्रशासन यांनी विविध मार्गदर्शक सूचनांचे रतीब गेल्या तीन महिन्यात घालून दिले आहेत़ नागरिकांसह विविध बँका, व्यवसाय प्रतिष्ठाने यांंच्यासाठी असलेल्या या सूचनांचे पालन मात्र होतच नसल्याचे चित्र आहे़ याचे सर्वाधिक स्पष्ट उदाहरण शहरातील विविध भागातील एटीएम असल्याचे दिसून येत आहे़
‘लोकमत’ने शहरातील एटीएम सेंटर्समध्ये करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची प्रत्यक्ष भेटीतून पडताळणी केली असता, सोशल डिस्टन्सिंग, सॅनेटायझेशन, स्वच्छता, मास्कचा वापर, मार्गदर्शक सूचना, तसेच कार्ड स्वाईप केल्यानंतर होणारी स्वच्छता याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याचे दिसून आले़ शहरात राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खाजगी बँकांच्या १५ शाखा आहेत़ तसेच शेड्यूल कोआॅपरेटीव्ह आणि व्यापारी बँकांच्याही शाखा आहेत़ या सर्व बँकांनी मिळून २० पेक्षा अधिक ठिकाणी एटीएम सेंटर्स तयार केले आहेत़
लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यामुळे सध्या व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने नागरिक पैसे काढण्यासाठी दरदिवशी एटीएममध्ये भेटी देत आहेत़ यातून एखादा बाधित आधीच एटीएममध्ये येऊन गेल्यास कोरोना संसर्गाचा धोका असून यासाठी बँकांना सूचना करुनही उपाययोजना केलेल्या नाहीत़
एटीएममध्ये प्रवेश करणाऱ्यांचा तेथील दरवाजे, मशिन यासोबत संपर्कात येतो़ यामुळे त्याठिकाणी सॅनेटायझर्स ठेवणे गरजेचे आहे़ परंतु शहरात एकाही एटीएममध्ये अशी कोणतीच उपाययोजना दिसून येत नाही़
सोशल डिस्टन्सिंग करवून घेण्यासाठी याठिकाणी कर्मचाºयांची नियुक्ती करणे गरजेचे असताना कोणीही दिसून आले नाही़
एटीएममध्ये हँड ग्लोव्हज वापरण्यासाठी देण्याच्या सूचना आहेत़ त्याबाबत साधी माहितीही बँकांना नाही़