जिल्हाभरातील खगोलप्रेमींनी घेतला सूर्यग्रहणाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:35 IST2020-06-22T11:35:28+5:302020-06-22T11:35:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वर्षातले पहिले सूर्यग्रहण आज रविवारी सकाळी १० वाजून १ मिनिटांनी सुरू झाले. शहरातील होळतर्फे ...

Astronomers from all over the district enjoyed the solar eclipse | जिल्हाभरातील खगोलप्रेमींनी घेतला सूर्यग्रहणाचा आनंद

जिल्हाभरातील खगोलप्रेमींनी घेतला सूर्यग्रहणाचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वर्षातले पहिले सूर्यग्रहण आज रविवारी सकाळी १० वाजून १ मिनिटांनी सुरू झाले. शहरातील होळतर्फे हवेली परिसरात आशापुरी माता फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर तर्फे खगोल प्रेमींसाठी ग्रहण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. नंदुरबारात ग्रहण काळात ७० ते ७५ टक्के सूर्यबिंबाचा भाग झाकला गेला होता. ढगाळ वातारणाचा फारसा परिणाम दिसून आला नाही.
सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. परंतु ग्रहण काळ सुरू होण्याच्या आधी ढगांची गर्दी आकाशात कमी झाल्याने सूर्यबिंब पुर्ण दिसू लागले. त्यामुळे खगोलप्रेमींमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रहण लागल्यापासून संपेपर्यंतच्या कालावधीत अल्पकाळ सूर्य ढगांच्या आड गेला होता. त्यामुळे सूर्यग्रहण पहाण्यात फारशी अडचण झाली नसल्याचे चित्र जिल्हाभरात होते. प्राचीन काळी विज्ञान प्रगत नव्हते. विज्ञानाच्या घडामोडींबद्दल नागरिकांना माहिती नव्हती. त्यामुळे ग्रहणाविषययी विविध गैरसमज होते. आता मात्र तसे नाही. त्यामुळे रविवारचे सूर्यग्रहण अनेकांनी पाहिले.
नंदुरबारात सूर्यबिंबाचा ७० ते ७५ टक्के भाग झाकलेला दिसत होता. त्यामुळे शहरात ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळाला. सकाळी १०.१ ते दुपारी १.३० या कालावधीत घराच्या छतावर जाऊन नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव विशिष्ट चष्म्यातून घेतला. खगोल प्रेमींसाठी ग्रहण पाहणे पर्वणीच असते.
शहरातील श्री.आशापुरी माता फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटील व त्यांचा पत्नी खगोल अभ्यासक चेतना पाटील यांनी ग्रहण पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली होती. उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी स्वाती पाटील, भाग्येश पाटील, हेमंत अहिरे, निलेश पाटील, आर्या पाटील उपस्थित होते.


ग्रहनकाळात गर्भवती महिलांनी भाज्या चिरु नये, त्याचप्रमाणे काही खाऊ नये,पाणी पिऊ नये अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आजही मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात.या सर्व अंधश्रद्धा ना झुगारून शहादा येथील अनेक महिला व तरुणी यांनी ही सर्व कामे जाहीरपणे करून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचा प्रयत्न केला. कुलकर्णी रुग्णालयाच्या छतावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिका व बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका कुलकर्णी, अंनिसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, अंनिस चे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, शाखा उपाध्यक्ष संगीता पाटील, अशोक पाटील, साजिद शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती असे तीन प्रकारचे सूर्यग्रहण पाहायला मिळत असतात. जिल्ह्यात दिसलेले सूर्यग्रहण हे खंडग्रास होते. खंडग्रास सूर्यग्रहणात सूर्याचा काही भाग झाकला जातो. विज्ञान जाणीव जागृती वाढल्याने ग्रहणाविषयीचे गैरसमज कमी झाले आहेत. त्यामुळे आजचे सूर्यग्रहण अनेकांनी पाहिले.
-चेतना पाटील, खगोल अभ्यासक.

Web Title: Astronomers from all over the district enjoyed the solar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.