पत्नीकडे पतीचा नंबर मागितल्याने बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST2021-02-27T04:42:56+5:302021-02-27T04:42:56+5:30
नंदुरबार : महिलेकडे तिच्या पतीचा मोबाइल नंबर मागितल्याचा राग येऊन चौघांनी एकास जबर मारहाण केल्याची घटना तोरणमाळ येथे घडली. ...

पत्नीकडे पतीचा नंबर मागितल्याने बदडले
नंदुरबार : महिलेकडे तिच्या पतीचा मोबाइल नंबर मागितल्याचा राग येऊन चौघांनी एकास जबर मारहाण केल्याची घटना तोरणमाळ येथे घडली. मारहाण करणाऱ्यास सोडविण्यासाठी गेलेल्या एकासही चौघांनी बदडले. म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश आत्माराम नाईक, रा.तोरणमाळ, राहुल आत्माराम नाईक, गुरुदेव आत्माराम नाईक, पहाडा नाईक रा.चिर्डे, ता.शहादा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तोरणमाळ येथील तारसिंग मधुकर रावताळे यांनी दिनेश नाईक यांच्या पत्नीकडे दिनेश यांचा मोबाइल नंबर विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्या वादातून मारहाण करण्यात आली. चौघांनी तारसिंग यांना लोखंडी पाईपने पाठीवर तर इतरांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी हिरमल नाईक हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली. त्यात दोघे जबर जखमी झाले.
याबाबत तारसिंग रावताळे यांनी फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक पावरा करीत आहे.