शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

पळासखोब्रा परिसरातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 12:54 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी, सांबर व पलासखोब्रा येथे पंतप्रधान ग्राम सडक ...

लाेकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी, सांबर व पलासखोब्रा येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत घाट सेक्शनच्या रस्त्यावर घाटातील चढाव कमी न केल्याने व आवश्यक वळणावर कटिंगदेखील व्यवस्थित करण्यात आले नाही. तसेच आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधल्या नसून, या मार्गावरील कामामुळे एस. टी. बसदेखील या मार्गावरून जाऊ शकणार नाही. तसेच पलासखोब्रा गावाच्या मांडवीचापाडा, मोजरापाडा, पिपलाआडीपाडा येथे विजेची सोय नसल्याने या पाड्यांवरील नागरिकांना अंधारातच आपले जीवन जगावे लागत आहे. डेब्रामाळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी येथे सीमा मोजणीचे काम अपूर्णावस्थेत असून, गावठाण स्मशानभूमी मोजणीचे काम पूर्ववत मोजणी करून मिळावे, या सर्व मागण्या २७ जानेवारीपर्यंत न सुटल्यास २८ जानेवारी रोजी वाघदेव बुदेमालपाडा येथे बेमुदत धरणे व चूलबंद आंदोलन करण्याचे नियोजन पलासखोब्रा येथील ग्रामसभेत करण्यात आले. यासंदर्भातील निवेदन पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, नायब तहसीलदार अजित शिंत्रे यांना दिले आहे.तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी सांबर पलासखोब्रा येथील २०१८-१९मध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून, या घाट सेक्शनचे चढाव व वळणेदेखील कमी करण्यात येत नाहीत. तसेच आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीदेखील बांधल्या नसल्याने या रस्त्यावर एस. टी. महामंडळाची बस येऊ शकणार नाही. वेलखेडी, सांबर, पलासखोब्रा या रस्त्यावर दिगडबारी, साबाचापाडा, मोहाडीखेत, फाफालपाडा, बारीपाडा, आवलीपाडा या भागात वळणाचा भागदेखील कटिंग केला नसून, चारचाकी वाहनाचा टर्नदेखील लागत नाही, तर एस. टी. बस या मार्गावर कशी धावेल. घाटाचा भाग असतानादेखील चढाव कमी करण्यात आलेला नाही. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंतीसह संरक्षण कठडे नसल्याने रस्ता धोकादायक  ठरत आहे. तसेच पलासखोब्रा गावाच्या मांडवीचापाडा, मोजरापाडा, पिपलाआडीपाडा येथे विजेची सोय नसल्याने हे पाडे अद्याप  अंधारात आहेत. डेब्रामाळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी येथे सीमा मोजणीचे काम अपूर्णावस्थेत असून, गावठाण स्मशानभूमी मोजणीचे काम पूर्ववत करून मिळावे, या मागण्यांसाठी वाघदेव बुदेमालपाडा येथे बेमुदत धरणे व चूलबंद आंदोलन करण्याचे नियोजन पलासखोब्रा येथील ग्रामसभेत करण्यात आले. यासंदर्भात पालकमंत्री ॲड. पाडवी व तहसीलदार अजित शिंत्रे यांना डेब्रामाळच्या सरपंचांनी निवेदन दिले असून, या निवेदनावर रामसिंग वळवी कंजाला, भीमसिंग राज्या वळवी वेलखेडी, दिलीप कोट्या वळवी पलासखोब्रा, बटेसिग वळवी, राजेंद्र जहागीर वळवी, रमेश मोयला वळवी, सामा खात्र्या वळवी, सायसिंग रणज्या वळवी, दिवल्या सोमता वळवी, बिजला नायका वळवी यांनी दिले आहे.