आशा कर्मचा:यांचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:10 IST2019-09-10T12:10:05+5:302019-09-10T12:10:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविकांच्या मानधन वाढ करून निर्णय घ्यावा यासह इतर मागण्यांसाठी कर्मचा:यांनी सोमवारी ...

आशा कर्मचा:यांचे जेलभरो आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविकांच्या मानधन वाढ करून निर्णय घ्यावा यासह इतर मागण्यांसाठी कर्मचा:यांनी सोमवारी जेलभरो आंदोलन केले. 11 सप्टेंबरपासून आक्रोश व बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केल्यानंतर जेलभरो करण्यात आले. यावेळी शेकडो आशा कर्मचारी उपस्थित होत्या. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचा:यांनी 4 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
11 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत आक्रोश आंदोलन करून थाळीनाद करण्यात येणार आहे. मानधन वाढ, भाऊबीज भेट, दहा हजार रुपये मानधन, गटप्रवर्तकांना 18 हजार रुपये मानधन द्यावे यासह इतर मागण्या आहेत.
यावेळी विजय दराडे ललिता माळी, वैशाली खंदारे, रत्ना नंदन आदींसह आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या कार्यकत्र्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.