कलाकार मानधन पेन्शनसाठी वृद्ध महिलेची फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST2021-03-07T04:28:06+5:302021-03-07T04:28:06+5:30

सविस्तर वृत्त असे की, सारंगखेडा येथील रहिवासी मनुबाई मगन गुरव ह्या मोलमजुरी करतात. त्यांचे पती मगन काशीराम गुरव हे ...

Artist's honorarium for old woman's pension | कलाकार मानधन पेन्शनसाठी वृद्ध महिलेची फिरफिर

कलाकार मानधन पेन्शनसाठी वृद्ध महिलेची फिरफिर

सविस्तर वृत्त असे की, सारंगखेडा येथील रहिवासी मनुबाई मगन गुरव ह्या मोलमजुरी करतात. त्यांचे पती मगन काशीराम गुरव हे कलाकार होते. आयुष्यभर त्यांनी बँड वाजवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. ते उत्कृष्ट शहनाई वाजत होते. मध्यंतरी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांना वृद्ध कलाकार मानधन मिळत होते. त्यावरच त्यांची उपजीविका सुरू होती. मात्र, एप्रिल २०१८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी मनुबाई यांनी वृद्ध कलाकार पेन्शन मिळावी म्हणून शहादा पंचायत समितीतील संबंधित विभागाकडे हयातीचा दाखला, मृत्यूचा दाखला, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, आदी सर्वच कागदपत्रांची पूर्तता केली. या कागदपत्रांची पूर्तता त्यांनी दोन ते तीनवेळा केली आहे. नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली. मात्र, आमच्यापर्यंत तुमची कागदपत्रे पोहोचली नसल्याचे सांगण्यात आले. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांना मिळणारे मानधन पत्नीला लगेच पेन्शन म्हणून मिळणे गरजेचे असताना अडीच वर्षांपासून या वृद्ध महिलेला संबंधितांकडे फिरफिर करावी लागत आहे. जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मनुबाई गुरव यांनी केली आहे.

Web Title: Artist's honorarium for old woman's pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.