लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील शास्त्री मार्केट परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणा-या शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. फारूख शेख सलीम पिंजारी रा. संगमटेकडी असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. फारूख हा शास्त्री मार्केट समोरील एका मोबाईलच्या दुकानासमोर संशयित स्थितीत पोलीस पथकाला मिळून आला होता. त्याची झडती घेण्यात आली असता, त्याच्याकडून स्क्रू ड्रायवर आणि पकड जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई हेमंत बारी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास सोमवारी अटक करुन न्यायालयात हजर केले होते.
शहरात चोरीच्या उद्देशाने फिरणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:06 IST