दुसरा विवाह करुन पहिल्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:16 IST2019-12-23T12:16:42+5:302019-12-23T12:16:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुसरा विवाह करुन सवत घरी आणल्यानंतर पतीकडून होणाºया सततच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची ...

Arrest husband for molesting first wife by second marriage | दुसरा विवाह करुन पहिल्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक

दुसरा विवाह करुन पहिल्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुसरा विवाह करुन सवत घरी आणल्यानंतर पतीकडून होणाºया सततच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना मोठी राजमोही ता़ अक्कलकुवा येथे घडली़ याप्रकरणी पोलीसांनी संशयित पतीस अटक केली आहे़ २१ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास महिलेने आत्महत्या केली होती़
शितल जर्मनसिंग वळवी (३०) असे मयत महिलेचे नाव आहे़ मयत शितल हिचा पती जर्मनसिंग मानसिंग वळवी हा सात ते आठ महिन्यांपासून चारित्र्यावर संशय घेत तिला मारझोड करत होता़ दरम्यान चार महिन्यांपूर्वी त्याने दुसरा विवाह करुन घेत पत्नी शितल हीला त्रास देणे सुरुच ठेवले होते़ शितल हीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारिरिक व मानसिक छळ सुरु होता़ पतीकडून सातत्याने केल्या जाणाºया छळाला कंटाळून २१ रोजी शितल वळवी यांनी घरातील छताच्या आड्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली होती़ घटनेमुळे राजमोही गावात एकच खळबळ उडाली होती़ हा प्रकार समजून आल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी पोलीसात धाव घेतली होती़
यातून दिलवरसिंग गणपत वळवी रा़ मोठी राजमोही यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन जर्मनसिंग वळवी याच्याविरोधात पत्नी शितल हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत़
पोलीसांनी शनिवारी रात्री उशिरा संशयित जर्मनसिंग वळवी यास ताब्यात घेतले होते़ त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व पोलीस निरीक्षक डांगे यांनी राजमोही येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता़

Web Title: Arrest husband for molesting first wife by second marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.