जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी करणार व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:50 AM2020-03-30T11:50:18+5:302020-03-30T11:50:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महामार्ग, राज्यमार्गावरून जाणाऱ्या प्रवाशी व मजुरांच्या निवारा आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभाग ...

Arrangement of Zilla Parishad and PWD | जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी करणार व्यवस्था

जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी करणार व्यवस्था

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महामार्ग, राज्यमार्गावरून जाणाऱ्या प्रवाशी व मजुरांच्या निवारा आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिल्या आहेत.
कोविड-१९ आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हाबंदी लागू झाल्यानंतर कामासाठी स्थलांतर करून आलेले कामगार आपल्या राज्यात परतण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच बरेचसे कामगार जिल्ह्यातील विविध भागात अडकले असल्याने त्यांच्या उपजीविकेची आणि निवाºयाची समस्या निर्माण झाली आहे. सीमा भागातील अशा स्थलांतरीत कामगारांना अलगीकरणामध्ये ठेऊन त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार करावे. गरोदर माता/बालके यांची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यांना कोविड-१९ प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती द्यावी. आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित करावे. अशा कामगारांच्या व्यवस्थेसाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात अडकलेल्या बाहेरगावातील कामगारांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून अशा कामगारांनी गर्दीने प्रवास करू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. संचारबंदीच्या काळात मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करू इच्छिणाºया व्यक्ती आणि संस्थांनी प्रशासनाशी संपर्क साधावा आणि अधिकृत ठिकाणीच मदतीची रक्कम किंवा वस्तू देण्यात याव्यात, असेही डॉ.भारुड यांनी कळविले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागामार्फत शाळांना सुटी देण्यात आली असल्याने शिल्लक असलेली अंडी आणि दुधाच्या टेट्रापॅकची माहिती संकलीत करण्यात आली असून त्याचे गरजूंना वाटप करण्यात येत आहे. नंदुरबार येथे आलेल्या ९० मजूरांना याचे वाटप करण्यात आले असून मागणीनुसार साठा असेपर्यंत हे वाटप सुरू राहणार असल्याचे सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. शहादा उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी समाजमाध्यमाद्वारे विविध संस्थाना ४-५ दिवस उपयोगात येईल अशा जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्याचे आवाहन केले आहे. त्यात ५ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, १ किलो सोयाबीन तेल, १ किलो साखर, २०० ग्रॅम चहा, चटणी, हळद, साबण अशा साधारण ५०० रुपये किंमतीच्या वस्तूंचा समावेश आहे. टाटा ट्रस्ट आणि खिदमत फाऊंडेशनने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून ट्रस्टच्या सिनी उपक्रमाच्या माध्यमातून १७०० कीट उपलब्ध होणार आहेत. तर खिदमत फाऊंडेशनमार्फत ३०० कीट उपलब्ध होणार आहेत. गरजेनुसार अधिक कीट उपलब्ध करून देण्याची तयारी दोन्ही संस्थांनी दर्शविली आहे. आपत्तीकाळात मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी लक्ष्मण कोळी (८३२९८१७०३३), संदिप टेंभेकर (८६६९१३२७२३) किंवा चेतन गांगुर्डे (८२७५५६३९३९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गिरासे यांनी केले आहे.

नंदुरबार तालुक्यात स्त्रीशक्ती संस्था, सिंधी युवक मित्र मंडळ, चंदुभैय्या मित्र मंडळातर्फेदेखील भोजन व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. युवारंग प्रतिष्ठानतर्फे बंदोबस्ताससाठी तैनात पोलीस आणि इतर कर्मचाºयांना चहा, नाश्ता व भोजनाचे वाटप करण्यात येत आहे. याशिवाय विविध संस्था आणि व्यक्ती मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. दानशूर व्यक्तींनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Arrangement of Zilla Parishad and PWD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.