आरोग्यवर्धिनी केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणार- ॲड.के.सी.पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:05+5:302021-03-15T04:28:05+5:30

अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नूतन मुख्य इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी ...

Arogyavardhini Center will be converted into a rural hospital - Adv. KC Padvi | आरोग्यवर्धिनी केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणार- ॲड.के.सी.पाडवी

आरोग्यवर्धिनी केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणार- ॲड.के.सी.पाडवी

अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नूतन मुख्य इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, पंचायत समिती सभापती मनिषा वसावे, उपसभापती विजय पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शैखर रौंदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नारायण बावा,वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाडवी म्हणाले, प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गुजरातलगत असल्याने गुजरात राज्यातील सीमावर्ती तसेच गावालगत मुख्य रस्त्यामुळे होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता या भागातील नागरिकांना या ठिकाणी चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम केल्याने या भागातील लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या केंद्रातील साहित्य खरेदीसाठी जिल्हा वार्षिंक योजनेतंर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी असला तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. वळवी म्हणाल्या, या आरोग्यवर्धिनी केंद्राचे काम खूप चांगले झाले आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांच्या माध्यमातून येथील परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हे प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र तयार करण्यात आले असून त्यावर एक कोटी ७४ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच येथील अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाचे नुतनीकरणासाठी ४० लक्ष निधी प्राप्त झाल्याची माहिती डॉ. बोडके यांनी यावेळी दिली. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले त्यानंतर त्यांनी आरोग्यवर्धिनी केंद्राची पाहणी केली व माहिती घेतली.

यावेळी जि.प. सदस्य प्रताप वसावे, सी.के.पाडवी, शंकर पाडवी, नटरवदादा पाडवी, निलुबाई पाडवी, सरपंच करुणा वसावे, उपसरपंच विनोद कामे तसेच गावातील नागरिक तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Arogyavardhini Center will be converted into a rural hospital - Adv. KC Padvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.