बँकेच्या कर्मचाऱ्यांची मनमानी, शहादा; स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांना ग्राहक पंचायतीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:20+5:302021-06-16T04:40:20+5:30

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय स्टेट बँकेच्या शहादा शाखेत ग्राहकांना योग्य सेवा मिळत नाही. बँकेतील कर्मचारी मनमानी करीत असून ...

Arbitrariness of bank employees, martyrdom; Statement of Consumer Panchayat to State Bank Branch Managers | बँकेच्या कर्मचाऱ्यांची मनमानी, शहादा; स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांना ग्राहक पंचायतीचे निवेदन

बँकेच्या कर्मचाऱ्यांची मनमानी, शहादा; स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांना ग्राहक पंचायतीचे निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय स्टेट बँकेच्या शहादा शाखेत ग्राहकांना योग्य सेवा मिळत नाही. बँकेतील कर्मचारी मनमानी करीत असून ग्राहकांचे समाधान करण्याऐवजी अरेरावीच्या भाषेत उत्तरे देत असल्याच्या तक्रारी आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात असलेल्या या शाखेत तालुक्यातील बहुसंख्य नोकरदार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, व्यावसायिक आदींची बँक खाती आहेत. या शाखेत दैनंदिन बँकिंग व्यवहारासाठी १० ते १२ काऊंटर दिसून येतात. मात्र, पैकी फक्त तीन ते चार काऊंटरवर कर्मचारी उपस्थित राहत असल्याचे चित्र नेहमीचेच असते. सर्वसामान्य ग्राहकांना पैशांच्या देव-घेवीसह अन्य व्यवहारासाठी बँकेत जाणे अपरिहार्य ठरते. मात्र येथील कर्मचारी समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरत असल्याने ग्राहक संभ्रमित होतात. या ठिकाणी कोणाही कर्मचाऱ्याला विचारले असता ‘तीन’ क्रमांकाचे काऊंटरवर जा असे सांगून ग्राहकांची फिरवाफिरव केली जाते. अन्य काऊंटरवर कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ‘तीन’ क्रमांकाच्या काऊंटरवर दररोज गर्दी राहते. त्यामुळे ग्राहकांना एका कामासाठी तासन्‌तास ताटकळत रहावे लागते. पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध असताना फक्त तीन ते चार काऊंटर सुरू ठेवल्याने तेथेच सातत्याने गर्दी होते. येथील ‘तीन’ नंबरच्या काऊंटरवरील कर्मचारी वगळता इतर कर्मचारी ग्राहकांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने प्रसंगी वादविवाद व हमरातुमरीचे प्रसंग येतात.

शाखेच्या आवारात ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम मशीनचे कॅबीन आहे. या ठिकाणी तीन ते चार मशीन असून त्यातील कोणतेही एक वगळता अन्य मशीन सातत्याने नादुरुस्त असतात. चारपैकी एखाद्या मशीनमधूनच पैसे निघत असल्याने एटीएम मशीनबाहेर मोठी गर्दी होत असते. शनिवार व रविवारी एटीएम मशीनमध्ये रक्कमच राहत नसल्याने ग्राहकांना खाली हात जावे लागते. ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी सर्व नादुरुस्त मशिन्स दुरुस्त करण्यात याव्यात व सर्वच एटीएम मशीनमध्ये दररोज पुरेशी रक्कम ठेवण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शहादा तालुकाध्यक्ष प्रा.डी.सी. पाटील, उपाध्यक्ष हिरालाल माळी, डॉ. खलील शाह, प्रसिद्धी प्रमुख प्रा. ज्ञानी कुलकर्णी, विष्णू जोंधळे, अनिल राठोड आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Arbitrariness of bank employees, martyrdom; Statement of Consumer Panchayat to State Bank Branch Managers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.