तळोदा तालुक्यात वीज कंपनीचे दोन फिडर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST2021-06-28T04:21:20+5:302021-06-28T04:21:20+5:30

याबाबत वीज कंपनीच्या तळोदा येथील उपकार्यकारी अभियंता प्रदीप वाय. चहांदे यांना संपर्क केला असता, राज्यशासनाने दोन्ही फिडरसाठी प्रस्ताव दिले ...

Approved two feeders of power company in Taloda taluka | तळोदा तालुक्यात वीज कंपनीचे दोन फिडर मंजूर

तळोदा तालुक्यात वीज कंपनीचे दोन फिडर मंजूर

याबाबत वीज कंपनीच्या तळोदा येथील उपकार्यकारी अभियंता प्रदीप वाय. चहांदे यांना संपर्क केला असता, राज्यशासनाने दोन्ही फिडरसाठी प्रस्ताव दिले होते. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच दोन्ही फिडरवरील कामे युद्धपातळीवर सुरू होतील, सहा महिन्यांपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती दिली.

या दाेन्ही फिडरमुळे तालुक्यातील विजेची समस्या मिटणार असल्याचा दावा केला जात आहे. यातून शेतकरी व वीज अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियमित होणारे वादही संपतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

रेवानगर फिडरला अमोनी, सरदारनगर, राजमोही, जांभीपाडा, कालीबेल, माळ खुर्द, चिरमड, रापापूर, चाैगाव ही गावे आहेत.

मोठा धनपूर फिडरवर प्रतापपूर, सावरपाडा, मोठा धनपूर, बंधारा, सीतापावली, चिलीपानी, मोकसमाळ, केलीपानी, अक्राणी, राणीपूर, खर्डी, टाकळी, गढीकोठडा, गढावली, अलवान, बोरवण, रोझवा, कोठार, पाडळपूर, खर्डी बुद्रूक, नवागाव, रांझणी, गोपाळपूर, वरपडा आदी गावे व पाडे जोडली जाणार आहे. दोन्ही नवीन फिडरमुळे या गावांचा वीज प्रश्न सुटणार आहे.

दरम्यान तळोदा तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून घरगुती आणि कृषिपंपांच्या बिलांची वसुली मोहीम सुरू करण्यात आली होती. यातून कृषिपंपधारकांकडून तीन कोटी ६० लाख तर घरगुती वीज ग्राहकांकडून एक कोटी ९० लाख असा एकूण ५ कोटी ७० लाख रुपयांची वसुली झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Approved two feeders of power company in Taloda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.