पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 17 विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:09 IST2019-06-12T12:09:18+5:302019-06-12T12:09:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 41 लाख रुपयांच्या खर्चासह 39 कोटी रुपयांच्या शिलकीला मंजूरी देण्यात आली़ ...

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 17 विषयांना मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 41 लाख रुपयांच्या खर्चासह 39 कोटी रुपयांच्या शिलकीला मंजूरी देण्यात आली़ सभेत एकूण 17 विषय मांडण्यात येऊन बहुमताने मंजूर करण्यात आल़े सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या़
मंगळवारी सकाळी 11 वाजता नगरपालिका आवारातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होत़े व्यासपीठावर उपनगराध्यक्ष परवेज खान करामत खान, मुख्याधिकारी गणेश गिरी उपस्थित होत़े प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आल़े यानंतर विषयांचे वाचन सुरु झाल़े नगराध्यक्षांची रजा मंजूर करणे, आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्चाचा हिशोब सादर करण्यात आला़ यास सत्ताधारी नगरसेवकांनी बहुमताने मंजूरी दिली़ पालिकेकडे हस्तांतरणीय विकास हक्क देऊन जमिन अधिग्रहण करण्यासाठी प्रणाली व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली़
विषयाला मंजूरी मिळाल्यानंतर होऊ घातलेल्या टीडीएस योजनेसाठीच्या समितीत विरोधी गटाच्या नगरसेवकाची समितीत निवड करण्याची मागणी करण्यात आली़ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2022 र्पयत पात्र लाभार्थीना घरकुल उपलब्ध करुन देण्याच्या कामाची अंमलबजावणी करण्याचा विषय मंजूर करण्यात आला़ यावेळी विरोधी गटाने घरकुल लाभार्थीना सुविधा नसल्याचा आरोप केला़
सभेदरम्यान पालिका घनकचरा व्यवस्थापनांतर्गत बायोमायनिंग ऑफ ओल्ड डंप्ड, सॉलिड वेस्टचे काम करणारे मक्तेदार, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जागेस वॉलकंपाउंड बांधणारे ठेकेदार, अमृत योजनेंतर्गत 2015-16 या वर्षासाठी नमस्कार कॉलनी ब्युरीयल ग्राऊंड ओपन स्पेस क्रमांक नऊ आणि 11 या जागेत पब्लिक पार्क विकसित करणारे आणि अमृतयोजनेंतर्गत 2017-18 या वर्षासाठी बन्सीलाल नगर, राणी माँ पार्क, एमएल टाऊन, द्वारकाधिश नगर, समर्थ नगर, मैय्यबी नगर, स्वामी समर्थ नगर येथे अमृत वन विकसित करणे या पाच कामांच्या ठेकेदारांच्या मुदतवाढीच्या अर्जावर चर्चा झाली़ हे विषय मंजूर केल्यानंतर त्यांच्याकडून दंड वसुली करण्याची मागणी विरोधी गटाने केली़
सिटी सव्रे क्रमांक 169 पैकी जागेवरील 141 चे आरक्षण व्यपगत झाल्याने त्यावर निर्णय घेणे, पालिकेस आवश्यक नसलेले जागा फायर ब्रिगेड स्टेशनच्या आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या अर्जावर विचारविनिमय करणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सी आणि डी करीत शुल्क आकारणी बाबत विचार विनिमय, संगणक प्रणाली अद्ययावत करणे करण्यासाठी संभाव्य खर्चास मंजूरी देण्यासह पालिका हद्दीतील गट क्रमांक 400 ते 404 हे क्षेत्र शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यासाठी घेतलेल्या निर्णयास अंतिम मंजूरी देण्याच्या विषयांना मंजूरी देण्यात आली़
सभेदरम्यान नगरपालिकेने कर व दरातून 2018-19 या वर्षात 10 कोटी 61 लाख 53 हजार 767 रुपये, विशेष अधिनियमाखाली 45 लाख 21 हजार 803, मिळकत व अधिकारापासून 2 कोटी 19 लाख 96 हजार 399 वसुली केली होती़ अनुदानापोटी पालिकेकडे 16 कोटी 68 लाख 24 हजार 992, संकीर्ण 5 कोटी 99 लाख 91 लाख 308 असे एकूण 39 कोटी 68 लाख 43 हजार 15 रुपये पालिकेकडे यंदाच्या आर्थिक वर्षात जमा झाले होत़े गत वर्षभरात पालिकेकडून सामान्य प्रशासन, सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य व सुखसोई, शिक्षण यासाठी 41 लाख 91 हजार 747 रुपयांचा खर्च करण्यात आला़ या संपूर्ण खर्चाला पालिकेच्या सभेत मंजूरी देण्यात आली़
सभेत पालिका हद्दीतील मालमत्तांची 2019-2020 ते 2022-2023 चतरुर्थ वार्षिक कर आकारणी करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला़ या ठरावानुसार पालिका कर वाढीबाबत विचारविनिमय करुन बांधकामांचा आढावा घेऊन करवाढ किंवा त्यासंदर्भातील कामकाजाबाबत शासनाला प्रस्ताव सादर करणार आह़े या प्रस्तावानंतर पुढील कारवाई होणार आह़े किमान सहा महिने मोजमापे करण्यात येऊन सव्रेक्षण होणार असल्याची माहिती आह़े