नंदुरबार पालिका स्थायी समितीच्या सभेत १५ विषयांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST2021-09-10T04:37:12+5:302021-09-10T04:37:12+5:30

शहरातील पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी एलईडी लाईट खरेदीची निविदा मंजुरी, धानोरा रोड परिसरात पाईप लाईन काम, पाणीपुरवठा विभागातील मोटारींची दुरुस्ती ...

Approval of 15 issues in Nandurbar Municipal Standing Committee meeting | नंदुरबार पालिका स्थायी समितीच्या सभेत १५ विषयांना मंजुरी

नंदुरबार पालिका स्थायी समितीच्या सभेत १५ विषयांना मंजुरी

शहरातील पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी एलईडी लाईट खरेदीची निविदा मंजुरी, धानोरा रोड परिसरात पाईप लाईन काम, पाणीपुरवठा विभागातील मोटारींची दुरुस्ती या कामांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियांतर्गत बेघरांना शाळा क्रमांक एकमध्ये तात्पुरता निवारा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. सभेत रज्जाक पार्क भागात चार लाख ८५ हजार १६८ रुपयांच्या संरक्षक भिंत बांधकामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. इंदिरा मंगल कार्यालयात पीओपीच्या कामास तसेच पालिका उद्यान आणि खुल्या जागेत मनोरंजनात्मक खेळणी बसवण्याच्या कामासाठी प्राप्त निविदा दरांना यावेळी मंजुरी दिली गेली. सभेत शहरातील गाैतम नगरात काँक्रिट गटारीचे बांधकाम व इतर २१ कामांसाठी निविदा मंजूर करण्यात आली.

स्थायी समितीकडून मिनाताई ठाकरे माँ-बेटी उद्यानात मल्टी-प्ले-स्टेशन प्रकारची खेळणी खरेदी करून बसवण्याच्या कामासाठी संभाव्य खर्चास व निविदा प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या मालकीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव, विमलाई महिला जीम व मातोश्री माँ साहेब मिनाताई ठाकरे उद्यानाच्या वास्तूसाठी सेवाभावी संस्थेस प्रायोगित तत्त्वावर देखभाल दुरुस्ती व परिरक्षणासाठी देण्याबाबत विचारविनिमयही करण्यात आला.

Web Title: Approval of 15 issues in Nandurbar Municipal Standing Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.